आरटीओतील ३६ टक्के पदे रिक्त राहण्यामागे हे आहे कारण…

आरटीओतील ३६ टक्के पदे रिक्त राहण्यामागे हे आहे कारण…

राज्यात सद्यस्थितीमध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांमुळे अनेक विभागातील जागा अजूनही रिकाम्या आहेत. परिवहन विभागातील पदेही अशीच रिक्त आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या अधिकारी वर्गावर कामाचा ताण वाढलेला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या सध्या राज्यातील परिवहन विभागातील अ, ब आणि क वर्गातील जागा रिक्त आहेत. जवळपास ३६ टक्के रिक्त असलेल्या जागांमुळे कामाचा ताणही वाढत आहे. शिवाय वाहनचालक व मालकांनाही वारंवार कामासाठी येजा करावी लागत आहे.

आरटीओ तसेच परिवहन विभाग कार्यालय असे मिळून अ, ब, क, ड वर्गाच्या मिळून एकूण ५ हजार १०० जागा शासनाने मंजूर केलेल्या आहेत. त्यातील ३ हजार २६८ जागा केवळ भरल्या आहेत. सध्याच्या घडीला १ हजार ८३२ म्हणजे अदमासे ३६ टक्के जागा रिकाम्या असल्यामुळे अतिरिक्त ताण पडत आहे. अ, ब तसेच क या वर्गातील जागा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच भरल्या जातात. आत्ताच्या घडीला क वर्गामध्ये तब्बल ७८२ जागा या कार्यकारी पदाच्या आहेत. तसेच अ वर्गामध्येही तब्बल ३३ टक्के जागा रिकाम्या आहेत. त्यामुळेच अ, ब तसेच क वर्गामध्ये कुठलीही भरती केवळ एमपीएससी परीक्षेअभावी झाली नाही हे आता स्पष्ट झालेले आहे.

हे ही वाचा:
चुलीत पडून पाठ भाजली…संसार वाहून गेला

लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का नाही? उच्च न्यायालयाचा सवाल

‘बिर्याणी’चे पोस्टमॉर्टेम करा!

आता आर या पार! गोंधळ संपवा, निर्णय घ्या!

राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील २८ जुलै रोजी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अजूनही कुठलाही निर्णय जाहीर न झाल्याने आता पुन्हा एकदा एमपीएससी परीक्षा तसेच पदभरती हे मुद्दे चर्चेत आले आहेत.

Exit mobile version