27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषपुराच्या विळख्यात अडकलेल्या बसमधील ३५ प्रवाशांची सुटका

पुराच्या विळख्यात अडकलेल्या बसमधील ३५ प्रवाशांची सुटका

Google News Follow

Related

राज्यभरात पावसाचा कहर सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यालाही पावसाचा दणका बसला आहे. ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असतानाच चंद्रपूर मधील चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या खासगी बसमधील ३५ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. पुराच्या पाण्याने वेढलेल्या या पाण्यातून जाऊ नये असा इशारा स्थानिकांनी देऊनही त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत ही बस पुराच्या पाण्यात नेली आणि बस पुराच्या पाण्यात फसली. विरुर पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली.
पुराच्या पाण्यात अडकलेली ही बस मध्यप्रदेश येथून चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. परंतु, चालकाने शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोलीमध्ये आणली. चालकाचा हा शॉर्टकट चांगलाच महागात पडला. पोलिसांनी देखील पुढचा मार्ग बंद असल्याचे सांगितले होते. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष्य करत बस तशीच पुढे दामटवली. शेवटी पहाटे पाच वाजता बस पुराच्या पाण्यात बंद पडली. बसचा अर्धा भाग पुराच्या पाण्यात बुडल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. जिवाच्या भीतीने प्रवासीही भेदरले होते. अखेर विरुपुराच्या पाण्यात अडकलेल्या बसची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पहाटेच्या अंधारात बचाव कार्य सुरू झाले. स्थानिकही मदतीला सरसावले.
पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असतानादेखील स्थानिकांच्या मदतीने दोऱ्या बांधून बसमधील पुरुष, वृद्ध, लहान मुले व महिला यांची सुखरुपपणे सुटका केली. नंतर या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून त्यांना हैदराबादच्या दिशेने रवाना करण्यात आले. पोलिसांचे प्रसंगावधान आणि धाडसामुळे हे प्रवासी सुखरूप बचावले.
नागपूरचे जनजीवन विस्कळीत
नागपूरमधील अनेक वस्त्यात पाणी शिरल्याने  जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवेगावखैरी, नांद, वेणा या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
हे ही वाचा:
नाशिक जिल्ह्यातही गेल्या चार दिवसांपासून संततधार कायम आहे. नाशिकमध्ये रौद्ररूप धारण केलेल्या गोदावरी नदीच्या पाण्यामुळे वैजापूर येथील सराला बेट परिसराजवळील शिंदे वस्तीला वेढा घातला आहे. या वस्तीवर एकूण ४५ कुंटुबातील ३८० नागरिक वास्तव्यास आहेत. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल, असे वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी म्हटले आहे.
जायकवाडी धरण ५९ टक्के भरणार
पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ४३ टक्क्यांवर पोहोचला असून येत्या २४ तासांत धरण ५९ टक्के भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जायकवाडीत पाण्याचा ओघ सुरुच असल्याने गेल्या २४ तासांत जायकवाडीच्या पाणीसाठ्यात साडेसहा टक्के वाढ झाली आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा