आयपीएल २०२४च्या लिलावासाठी ३३३ खेळाडू सज्ज

२३ खेळाडू २ कोटींच्या मर्यादेत

आयपीएल २०२४च्या लिलावासाठी ३३३ खेळाडू सज्ज

इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी खेळाडूंच्या लिलावाची यादी जाहीर झाली आहे. १९ डिसेंबरला दुबई येथे या खेळाडूंचा लिलाव होणार असून एकूण ३३३ खेळाडू या लिलावात सहभागी होतील. त्यात ट्राविस हेड आणि पॅट कमिन्स हे खेळाडू अग्रणी आहेत.

 

येत्या मार्चमध्ये आयपीएल खेळविली जाईल. यावेळी ती थोडी आधी खेळविली जात असून टी-२० वर्ल्डकप २०२४च्या अनुषंगाने आयपीएलचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. वर्ल्डकप जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळविला जाणार आहे.

 

आयपीएलसाठी ३३३ खेळाडूंची नोंदणी झाली असून त्यातून ७७ खेळाडू १० फ्रँचाइझींसाठी घेतले जाणार आहेत. फ्रँचाइझींकडे आता २६२.९५ कोटी रुपये शिल्लक आहेत. यापैकी गुजरात टायटन्सकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. गुजरातकडून हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडे गेल्यानंतर गुजरात टायटन्सकडे उरलेली रक्कम मोठी आहे. गुजरातच्या खात्यात सध्या ३८.१५ कोटी रु. जमा आहेत.

हे ही वाचा:

हातमिळवणी काँग्रेससोबत अपेक्षा मोदींकडून

कलम-३७० हटवण्याचा निर्णय योग्यच!

मायावतींची भाच्यावरच ‘माया’

अंतराळ शक्ती बनण्यासाठी भारतीय हवाई दलाने कंबर कसली!

इतर संघांकडे असलेली रक्कम

चेन्नई सुपर किंग्ज ३१.४ कोटी

डेक्कन चार्जर्स २८.९५ कोटी

कोलकाता नाइट रायडर्स ३२.७ कोटी

मुंबई इंडियन्स १७.७५ कोटी

पंजाब किंग्ज २९.१ कोटी

लखनऊ सुपर जायन्ट्स १३.१५ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू २३.२५ कोटी

राजस्थान रॉयल्स १४.५ कोटी

सनरायझर्स हैदराबाद ३४ कोटी

 

आयपीएलच्या २०२४च्या लिलावात २३ खेळाडूंचा समावेश २ कोटींच्या मूळ रकमेत करण्यात आला आहे. त्यात २० परदेशी खेळाडू असून ट्राविस हेड, मिचेल स्टार्क, पॅट कमिस, हॅरी ब्रूक आदिंचा समावेश त्यात आहे तर हर्शल पटेवल, उमेश यादव व शार्दुल ठाकूर हे अन्य तीन खेळाडू आहेत.

 

 

राचिन रवींद्र याने मात्र वनडे वर्ल्डकप गाजवला असतानाही २ कोटींच्या रकमेसाठी स्वतःचे नाव सुचविलेले नाही. त्याने स्वतःला ५० लाखांच्या मर्यादेत ठेवले आहे. इंग्लंडचा जोफ्रा आर्चर याने स्वतःला लिलावापासून लांबच ठेवले आहे.

Exit mobile version