छत्तीसगडच्या सुकमा मध्ये ३३ नक्षलवाद्यांनी पोलीस आधीक्षक यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे. सुकमा जिल्हा पोलिसांनी १४ फेब्रुवारीला जारी केलेल्या निवेदनात हि माहिती मिळाली आहे. आत्मसमर्पण केलेले सर्व नक्षलवादी हे किस्तराम पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होते.
आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना पुनर्वसन धोरणांतर्गत मदत जाहीर केली असून इतर सुविधा सुद्धा देण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्वाधिक नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखणाऱ्या तोंडमार्क आणि डब्बामरका इथे सुरक्षा शिबिरे उभारण्यात आली आहेत. परिसरात इथे होत असलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन नक्षलवादी मोठ्या प्रमाणांत मुख्य प्रवाहात सामील होत आहेत.
डब्बमर्कां येथे आयोजित नव्यानेच सुरु झालेल्या छावणीत मोठ्या संख्येने ग्रामास्थांच्या उपस्थितीत ३३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पुढे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कि जवानांच्या मदतीने १३ फेब्रुवारीला प्रथमच सगळ्या गावकऱ्यांचे आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहे.
याशिवाय आरोग्य शिबिरे आयोजित करून बऱ्याच लोकांवर उपचार सुद्धा करण्यात आले. या आरोग्य शिबिरात सर्दी, फ्लू ,कंबरदुखी, पाठदुखी, ब्लड प्रेशर , आणि इतरही आजारांवर तपासणी करून औषधे सुद्धा देण्यात आली. शिबीर सुरु झाल्यापासून सर्व परिसरातील रस्तेबांधणी, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, दूरसंचार, सार्वजनिक वितरण व्यवस्था, शासकीय इमारतींचे बांधकाम, शिक्षण आणि इतरही पायभूत सुविधा यांच्या विकासकामांची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
पुनर्वसन धोरणांतर्गत राज्य सरकार सुविधा देणार
पोलीस अधीक्षक शर्मा यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पण करणाऱ्या सर्वच नक्षलवाद्यांना मदत आणि इतर सुविधा देणार आहेत. बस्तर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुंदरराज पी. यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या नक्षलविरोधी अभीयानाचे चांगले परिणाम दिसत आहेत. परिसरात सुरु असलेल्या कमला वेग येत आहे. तर आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे असे म्हणणे आहेकी, विकासाच्या शक्यता पाहता ते नाक्षलवादाचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत.