जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील ३२ जण अडकले आहेत. ८ दिवस गाड्या सोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व सुखरूप आहेत. आम्हाला लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी ते करत आहेत.
एका महिला पर्यटकाने म्हटले की, हल्ल्याच्या घटनेनंतर पहलगाममधून आम्ही बाहेर पडलो आहोत. सर्व साधारण आम्ही जेष्ठ नागरिक आहोत. यातील काही लोकांना त्रास होत आहे. आमच्या दोन ट्रॅव्हल्स एका जंगल ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत. आम्हाला मदत मिळाली तर फार बरे होईल. दरम्यान, बुलढाण्यातील पाच जण पहलगाममध्ये अडकले आहेत. हडपसर, शिरूर, दौंड, तालुक्यातील ६५ पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
यासह जळगावच्या चाळीसगावमधील १४ पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. पर्यटकांमध्ये भीतीचे वातवरण आहे. ठिकठिकाणी हायअलर्ट देण्यात आला आहे. लवकरात लवकर राज्यात येण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
यामधील एका महिला पर्यटकाने सांगितले, आम्ही १४ जण आहोत, सुरक्षित आहोत. याठिकाणाहून शासनाने आमची लवकर सुटका करावी. आमच्या विभागातील खासदार स्मिता ताई आणि आमदार मंगेश दादा हे माझ्या सतत संपर्कात आहेत. त्यांनी आम्हाला धीर दिला आहे.
हे ही वाचा :
खासगी क्षेत्रातील सबस्क्राइबर्सची संख्या १२ लाख पार
एअरलाईन्सनी तिकीट दराबद्दल विचार करा
पहलगाम हल्लामुळे भीषण आठवणी ताज्या झाल्या
पहलगामची घटना पाकिस्तानची पूर्वनियोजित रणनीती
दरम्यान, कालच्या (२२ एप्रिल) दहशतवादी हल्ल्यात एकूण २७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. मृतांमध्ये सहा जण महाराष्ट्रातील आहेत. अतुल मोने (डोंबिवली), हेमंत जोशी (डोंबिवली), संजय लेले (डोंबिवली), संतोष जगदाळे (पुणे) कौस्तुभ गणबोटे (पुणे), दिलीप देसले (पनवेल) अशी मृतांची नावे आहेत.