बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी (४ जुलै) उसळलेल्या हिंसाचारात ३२ जणांचा मृत्यू झाला असून शेकडोजण जखमी झाले आहेत. विद्यार्थी आंदोलकांची पोलिस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान हसीना शेख यांच्या राजीमान्याची मागणी निदर्शकांनी यावेळी केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून सरकारने रविवारी संध्याकाळी ६ पासून अनिश्चितकाळासाठी देशभरात संचार बंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली. आरक्षणाच्या मागणीवरून मागच्या महिन्यात झालेल्या निदर्शनानंतर हा पुन्हा निर्णय घेण्यात आला.
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा कोटा रद्द करण्याच्या मागणीवरून विद्यार्थ्यांचे एक महिन्याहून अधिक काळ आंदोलन सुरूच आहे. मागील महिन्यात झालेल्या हिंसाचारात तब्बल २०० अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. दरम्यान, बांग्लादेशाच्या सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचा कोटा ५६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणला आहे परंतु अजूनही निदर्शने सुरूच आहेत.
हे ही वाचा..
पॅरिस ऑलिम्पिक: सेमीफायनलमधील पराभवानंतर सेनचे कांस्यपदकावर ‘लक्ष्य’
भारतीय हॉकी संघाने ब्रिटनला नमवले; पदकापासून एक पाऊल दूर !
मुस्लिम मुलांची ट्युशन घेणाऱ्या मुलीलाच केले मुस्लिम; उल्हासनगरात धक्कादायक प्रकार
‘विरोधकांना हवे ते म्हणू द्या, २०२९ मध्ये पुन्हा एनडीएचेच सरकार येणार’
आजच्या झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान शेख हसीना यांनी भाष्य केले आहे. या संपूर्ण घटनेचा निषेध करून ‘निषेधाच्या नावाखाली सरकारी मालमत्तेचे नुकसान करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी असल्याचे पंतप्रधान हसीना शेख यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा बैठकीनंतर पंतप्रधान हसीना म्हणाल्या की, “जे सध्या रस्त्यावर आंदोलन करत आहेत ते विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत आणि ते देशाला अस्थिर करण्यासाठी निघाले आहेत”. अशा लोकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आवाहन त्यांनी देशवासियांना केले.