रायगडमध्ये दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू

रायगडमध्ये दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ३५ घरांवर दरड कोसळली. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. या भीषण दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

काल सायंकाळी ४ वाजता ही दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून ३६ लोकांचे मृतदेह बाजूला काढले. पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण येत होता.

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. तर अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

सांगली, कोल्हापूरमध्ये २०१९ची पुनरावृत्ती होणार?

राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा

संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारकडून ‘ही’ नवी सुधारणा

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली

Exit mobile version