कर्नाटकमध्ये ३१८ किलो गांजा पकडला

केरळच्या तिघांना अटक

कर्नाटकमध्ये ३१८ किलो गांजा पकडला

बेंगळुरू पोलिसांनी ३.२५ कोटी रुपयांचा ३१८ किलोग्राम गांजाची मोठी खेप पकडली. गोविंदापुरा पोलिसांनी एका गुप्त माहितीवर कारवाई करत कारमध्ये ड्रग्जची वाहतूक करताना आढळलेल्या तीन जणांना अटक केली. पुरावा म्हणून वाहन जप्त करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी मूळचा केरळचा असून, त्याच्याकडे अमली पदार्थांची तस्करी करण्याचा इतिहास आहे. नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान बेकायदेशीर विक्रीच्या तयारीत बेंगळुरूमध्ये गांजाची तस्करी केली जात असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

हेही वाचा..

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या दराने घेतली उसळी

ज्ञानवापी प्रकरण: पुरातत्व सर्वेक्षणाच्या हिंदुंच्या याचिकेवर मुस्लिम पक्षाकडून मागवले उत्तर

कुस्तीपटू विनेश फोगट बेपत्ता, पोस्टर्स व्हायरल!

अटक टाळण्यासाठी केला हॉटस्पॉटचा वापर

गेल्या महिन्यात सेंट्रल क्राईम ब्रँच (CCB) बेंगळुरूमधील अंमली पदार्थ नियंत्रण युनिटने शहराच्या फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या कारवाईदरम्यान २१.१७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या युनिटने सीमाशुल्क अधिकाऱ्यांशी जवळून काम करताना प्रतिबंधित पदार्थ असलेले ६०६ पार्सल शोधून काढले. यूएस, यूके, बेल्जियम, थायलंड आणि नेदरलँड यांसारख्या देशांतून तस्करी करण्यात आलेले ड्रग्ज श्वानाच्या पथकाच्या मदतीने ३,५०० हून अधिक संशयास्पद पार्सलची तपासणी केल्यानंतर रोखण्यात आले.

जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये हायड्रो गांजा, एलएसडी, एमडीएमए क्रिस्टल्स, एक्स्टसी गोळ्या, हेरॉइन, कोकेन, ॲम्फेटामाइन, चरस, गांजा तेल यांचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले आहे की आरोपी हे पदार्थ भारतीय टपाल सेवेद्वारे बंगळुरूमध्ये महागड्या किमतीत विकण्यासाठी आयात करत होते. CCB नार्कोटिक्स युनिटने या वर्षी यापूर्वी १२ प्रकरणे नोंदवली होती आणि तत्सम अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या अनेकांना अटक केली होती.

Exit mobile version