नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे.नुकतेच काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील धार्णोली येथे शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. मात्र, एक विद्यार्थी बिबट्यापुढे सरसावत हा हल्ला परतवून लावला.आता पुन्हा इगतपुरी तालुक्यातील निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथील तरुणीवर बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला.ही घटना मंगळवार (३० जानेवारी) रोजी सकाळी पहाटेस घडली.मीनाक्षी शिवराम झुगरे (३१) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पहाटेच्या सुमारास मीनाक्षी ही तरुणी घराबाहेर पडल्यानंतर बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली.या हल्ल्यात मीनाक्षीचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.शवविच्छेदनानंतर गावांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे ही वाचा:
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’
अभिमानाचा क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारशासाठी नामांकित
तब्बल ३० तासानंतर सोरेन परतले रांचीला
भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या पीएफआयच्या १५ जणांना फाशी!
दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी निशाणवाडी भागात पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.तसेच पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली.दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून भागात तीन पिंजरे लावण्यात आले आहेत.