आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार
भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात नागरिकांसाठी कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. समन्वय प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली असून ५, ६ आणि ७ जून असे तीन दिवस या लसीकरण मोहीमेचा लाभ ठाणेकरांनी घेतला. या मोहिमेत ३००० ठाणेकरांचे लसीकरण केले गेले.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या लसीकरणासाठी सुरुवातीला ३००० ठाणेकर नागरिकांची गुगल फॉर्मद्वारे द्वारे नोंदणी करून घेण्यात आली. त्यानंतर गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना तीन दिवसांचे वेगवेगळे स्लॉट्स देण्यात आले. त्यानुसारच नागरिक केंद्रावर पोहोचून आपले लसीकरण करून घेत होते. अपोलो हॉस्पिटल च्या सहाय्याने ही लसीकरण मोहीम पार पडतील असून नागरिकांना कोवीशील्ड लस देण्यात आली. तर ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल निरंजन डावखरे यांचे ठाणेकरांमार्फत आभार मानले जात आहेत.
हे ही वाचा:
ईश्वर सेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय?
पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त
राज्यांच्या अपयशावर उतारा; सर्वांना मोफत लसीची मोदींची घोषणा
राज्यात ठाकरे सरकारने लसीकरणाचा खेळखंडोबा केला असताना राज्यातील युवाशक्तीचे अर्थात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे खूपच हाल पहायला मिळाले. सुरुवातीला राज्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण जाहीर करण्यात आले. पण काहीच काळात ठाकरे सरकार मार्फत हे लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासगी केंद्रांवर हे लसीकरण सुरू असले तरी ठाण्यात मात्र खासगी केंद्रांवरही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत ठाणेकर नागरिकांना मुंबई, नवी मुंबईत जाऊन खाजगी लसीकरण केंद्रावर घ्यावी लागत होते. त्यामुळे समन्वय प्रतिष्ठानचा हा उपक्रम ठाणेकर नागरिकांसाठी फारच लाभदायक ठरला आहे.