उत्पन्न कमी असताना ३० टक्के निधी भारत जोडो यात्रेवर खर्च!

निवडणूक आयोगाकडे पक्षाने दाखल केलेल्या वार्षिक ऑडिट अहवालातून माहिती समोर

उत्पन्न कमी असताना ३० टक्के निधी भारत जोडो यात्रेवर खर्च!

सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेल्या चार हजार किमीच्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर काँग्रेसने एकूण ७१.८ कोटी रुपये खर्च केले होते. ही रक्कम त्यांच्या वार्षिक खर्चाच्या १५.३ टक्के आहे. ही रक्कम २०२२-२३ दरम्यान पक्षाच्या प्रशासकीय आणि सर्वसामान्य खर्चाच्या एकूण ३० टक्के अधिक आहे. निवडणूक आयोगाकडे पक्षाने नुकत्याच दाखल केलेल्या वार्षिक ऑडिट अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, सन २०२२-२३मध्ये काँग्रेसचे एकूण उत्पन्न सन २०२१-२२मध्ये ५४१ कोटी रुपयांवरून ४५२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर, याच काळात खर्च ४०० कोटींवरून ४६७ कोटींवर पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी पक्षाचा ऑडिट रिपोर्ट जाहीर केला. या अहवालानुसार, सन २०२१-२२मध्ये निवडणूक बाँडच्या माध्यमातून काँग्रेसला एकूण २३६ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. तो सन २०२२-२३मध्ये १७१ कोटी रुपयांवर घसरला आहे.

हे ही वाचा:

ज्ञानवापीनंतर कृष्ण जन्मभूमीबाबतही हाच निर्णय येईल!

३० वर्षांनंतर व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चेला सुरुवात!

“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”

जनहितासाठी काम केले, रोजगाराच्या संधी वाढल्या, लोकांचे उत्पन्न वाढले!

सन २०२२-२३साठी निवडणूक आयोगाने सहा राष्ट्रीय पक्षांपैकी पाच पक्षांचे ऑडिट रिपोर्ट जाहीर केले आहेत. त्यात आप, बसप, सीपीएम, नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेसचा समावेश आहे. भाजपचा ऑडिट रिपोर्ट अद्याप आलेला नाही.
काँग्रेसच्या ऑडिट रिपोर्टनुसार, काँग्रेसने २०२२-२३मध्ये भारत जोडो यात्रेवर ७१.८ कोटी रुपये आणि निवडणुकांवर १९२.५ कोटी रुपये खर्च केले.

गेल्या आर्थिक वर्षात निवडणुकांवर २७९.५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पक्षाच्या प्रशासकीय आणि सर्वसामान्य खर्चात सन २०२१-२२च्या तुलनेत १६१ टक्के वाढ दर्शवण्यात आली आहे. सन २०२२-२३मध्ये निवडणूकपूर्व सर्वेक्षणांवर ४० कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च झाले आहेत. सन २०२१-२२च्या तुलनेत २३ लाख रुपये अधिक खर्च करण्यात आले आहेत.

Exit mobile version