लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही पैशांचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाची सर्वत्र नजर आहे.देशभरात अनके ठिकाणी कारवाई करत निवडणूक आयोगाच्या पथकाने करोडो रुपये जप्त केले आहेत.दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाच्या एसएसटी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मावळ लोकसभा मतदार संघात तपासणी दरम्यान एसएसटी पथकाने ही कारवाई केली आहे.पथकाने एका कारमधून सुमारे ३० लाख रुपये जप्त केले आहेत.एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील तपासासाठी ही रोकड आयकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे.याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलीस अधिकारी आणि एसएसटी कारची तपासणी करताना दिसत आहेत, ज्यातून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
“शाळा भरती घोटाळ्याबद्दल तृणमूलला निवडणुकीपूर्वीच सर्व माहित होते”
दिल्ली, नोएडामधील शाळांना आलेल्या धमकीच्या ईमेलपाठी आयएसआयचा हात?
अमित शाह एडिटेड व्हिडीओ प्रकरणी ‘एक्स’कडून झारखंड काँग्रेसचे अकाऊंट बंद
दरम्यान, निवडणुकीच्या वेळी मतदार संघात प्रचारासाठी होणारा अतिरेकी खर्च, रोख किंवा स्वरूपात लाचेचे वाटप, असामाजिक घटक किंवा अवैध शस्त्रे, दारुगोळा आणि दारूची वाहतूक यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध पथके तयार केली जातात.यापैकी एक पथक म्हणजे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (एसएसटी) पथक आहे.यामध्ये एक मॅजिस्ट्रेट आणि प्रत्येक टीममध्ये तीन किंवा चार पोलिस कर्मचारी असतात.अशा प्रत्येक टीमला चेकपोस्ट नेमून दिलेले असते.त्यानुसार नेमून दिलेल्या चेकपोस्टवर ते काम करतात.