मुंबई उपनगरीय रेल्वेचे नव्या वर्षात, ३० सरकते जिने

मुंबई उपनगरीय रेल्वेचे नव्या वर्षात, ३० सरकते जिने

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकात जडसामाना सह प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वे स्थाकात येत्या नव्या वर्षात, ३० सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे अबालवृद्धांसह प्रवाशांना सामानांची ने-आण करण्यासाठी सरकते जिने उपयोगात येतील. संबंधित सरकते जिने ३ महिन्याच्या कालावधीमध्ये मध्यसह पश्चिम रेल्वेच्या स्थानकांत बसविण्यात येणार आहेत.

वयोवृद्ध नागरिकांना शारीरिक समस्यामुळे जिने चढण्यासाठी त्रास होतो, त्यामुळे एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी काही प्रवासी रूळ ओलांडल्यामुळे अपघात होऊन दुर्घटना झाल्याचे घटना सुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती महिला यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी हे सरकते जिने व उदवाहक बसविण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

वर्ल्डकप जिंकूनही अर्जेंटिना नंबर वन नाहीच!

आफताबनंतर आता रियाझ…हिंदू तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला नदीत

भारत जोडो यात्रा पुढे ढकला…राहुल गांधींना पत्र

दरम्यान, मध्य रेल्वे विभागात २० आणि पश्चिम रेल्वेवर मार्च २०२३ पर्यंत १० सरकत्या शिड्या बसविण्याचे नियोजन आहे. सध्या पश्चिम विभागातील स्थानकात १०४ सरकत्या शिड्या आहेत. आणखी १० शिड्या मार्च २०२३ पर्यंत बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी चर्नीरोड, स्थानकात दोन तर सांताक्रूझ, वांद्रे स्थानक, वांद्रे टर्मिनल, विलेपार्ले, वसई रोड, सफाळे, वाणगाव, घोळवड स्थानकात प्रत्येकी एक सरकता जिना बसविण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर १११ शिड्या असून आणखी २० शिड्या बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये भायखळा, विद्याविहार, विक्रोळी, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, ठाकुर्ली, इगतपुरी, कांजूरमार्ग, स्थानकात प्रत्येकी दोन शिड्या आणि आणि आंबिवली व जीटीबी नगर स्थानकात प्रत्येकी एक सरकती शिडी लावण्यात येणार आहेत.

Exit mobile version