युद्धबंदीची चर्चा अयशस्वी, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू !

शाळा, रुग्णालय परिसरांना लक्ष्य

युद्धबंदीची चर्चा अयशस्वी, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू !

हमास प्रमुख इस्माईल हनिया याच्या मृत्यूनंतर इजिप्तची राजधानी कैरोमध्ये गाझामध्ये युद्धविरामासाठी चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ही चर्चा विस्कळीत झाली आहे. रविवारी (४ ऑगस्ट) इस्रायली सैन्याने गाझामध्ये हवाई हल्ले चढवले. या हवाई हल्ल्यांमध्ये शाळा, रुग्णालय परिसर आणि इतर ठिकाणी आश्रय घेणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्यात आले. या हवाई हल्ल्यांमध्ये एकूण ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इराणमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हनिया आणि लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचा वरिष्ठ कमांडर फुआद शुकर यांच्या हत्येमुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे

गाझा शहरातील दोन शाळांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात सर्वाधिक २५ लोक मारले गेले आहेत. देर अल-बालाह शहरातील रुग्णालयाच्या संकुलात उभारलेल्या तंबूत राहणारे चार लोक ठार झाले. तर इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या उपनगरात एका पॅलेस्टिनीने धारदार शस्त्राने हल्ला करून दोन इस्रायली नागरिकांची हत्या केली आहे.

हे ही वाचा..

महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन पडले महागात, टीएमसी मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा !

या हिंदू द्वेष्ट्याचे उद्धव ठाकरे कान उपटणार का?

बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार भडकला, ३२ जणांचा मृत्यू !

पॅरिस ऑलिम्पिक: सेमीफायनलमधील पराभवानंतर सेनचे कांस्यपदकावर ‘लक्ष्य’

दरम्यान, लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. रविवारी इराण समर्थित संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर सुमारे ५० रॉकेट डागले. यापैकी बहुतेक इस्त्रायली हवाई संरक्षण यंत्रणेने हवेत नष्ट केले, परंतु काही रॉकेटमुळे नुकसान झाल्याचीही माहिती आहे.

Exit mobile version