कठुआत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांवर रोखल्या बंदुका!

दोन्हीकडून गोळीबार सुरू

कठुआत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांवर रोखल्या बंदुका!

सोमवारी (३१ मार्च) रात्री १०.१५ वाजता कठुआ आणि बिल्लावार येथील उज्ज नदीलगतच्या पंचतीर्थी परिसरात तीन संशयितांना दिसले. दहशतवादी पळून जावू नयेत यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमे दरम्यान गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकोट पोलिस चौकीच्या पथकाने पंचतीर्थी बरोटा येथे तीन संशयितांच्या हालचाली पाहिल्या. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना गोळीबार झाला. गोळीबार होताच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही पाठवण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम सुरु आहे.  दरम्यान, गेल्या नऊ दिवसांत जिल्ह्यात झालेली ही तिसरी गोळीबाराची घटना आहे.

हे ही वाचा  : 

संसदेत वक्फ विधेयक मांडण्याची प्रक्रिया सुरू, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार!

मुरलेल्या फडणवीसांना पक्के ठाऊक आहे, चर्चेतील नाव यादीत नसते…

ममता जी ‘कौन सा धर्म गंदा है’?

बीड कारागृहात टोळीयुद्ध? वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण?

दरम्यान, आदल्या दिवशी उपमहानिरीक्षक शिवकुमार शर्मा यांनी सांगितले की, शेवटचा दहशतवादी मारला जाईपर्यंत ही कारवाई सुरूच राहील. सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले. “ऑपरेशन सुरू आहे आणि जोपर्यंत एकही दहशतवादी शिल्लक नाही तोपर्यंत जम्मू आणि काश्मीर पोलिस आपले ध्येय सुरू ठेवतील. आमचे दल दहशतवादाचा नाश करण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीरची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहे,” असे शिवकुमार शर्मा यांनी रियासी येथे पत्रकारांना सांगितले.
कठुआ जिल्ह्यातील सान्याल पट्ट्यातील एका दुर्गम जंगली भागात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या मोहिमेत चार पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले. यावेळी पोलिस उपअधीक्षकांसह तीन जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी चौकशीसाठी सहा जणांना ताब्यात घेतले आहे आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सांबा सेक्टरमध्ये परिसराची तपासणी करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. यासोबतच संपूर्ण सीमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Exit mobile version