सोमवारी (३१ मार्च) रात्री १०.१५ वाजता कठुआ आणि बिल्लावार येथील उज्ज नदीलगतच्या पंचतीर्थी परिसरात तीन संशयितांना दिसले. दहशतवादी पळून जावू नयेत यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमे दरम्यान गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकोट पोलिस चौकीच्या पथकाने पंचतीर्थी बरोटा येथे तीन संशयितांच्या हालचाली पाहिल्या. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना गोळीबार झाला. गोळीबार होताच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही पाठवण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम सुरु आहे. दरम्यान, गेल्या नऊ दिवसांत जिल्ह्यात झालेली ही तिसरी गोळीबाराची घटना आहे.
हे ही वाचा :
संसदेत वक्फ विधेयक मांडण्याची प्रक्रिया सुरू, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार!
मुरलेल्या फडणवीसांना पक्के ठाऊक आहे, चर्चेतील नाव यादीत नसते…
ममता जी ‘कौन सा धर्म गंदा है’?
बीड कारागृहात टोळीयुद्ध? वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण?