जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी टिपले तीन दहशतवादी!

सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरु

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी टिपले तीन दहशतवादी!

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे.दरम्यान, मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरात अजूनही सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरु आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, कुलगामच्या रेडवानी भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सोमवारी(६ मे) रात्री उशिरा सुरक्षा दलाला मिळाली होती.गुप्त माहितीच्या आधारे पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे पथक घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली.सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला.

हे ही वाचा:

‘छळामुळे’ काँग्रेस सोडलेल्या राधिका खेरा यांच्या हाती ‘कमळ’

‘निलेश मेहता’ बनला ‘बिजल मेहता’, लिंग शस्त्रक्रियेनंतर महिला म्हणून कामावर रुजू!

झारखंड रोकड जप्ती प्रकरणी मंत्र्यांच्या पीएसहित नोकरास अटक!

पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!

परिसरात प्रवेश करण्याचे आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग सील करण्यात आले आहेत. कडेकोट बंदोबस्त पाहताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.सोमवारी संध्याकाळी सुरु झालेली ही चकमक मंगळवारपर्यंत सुरू होती.या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.सुरक्षा दलाची अजूनही शोधमोहीम सुरु आहे.दरम्यान, ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Exit mobile version