27 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषछत्रपती शिवरायांनी नौसेनेला 'नवे सामर्थ्य, व्हिजन दिले'

छत्रपती शिवरायांनी नौसेनेला ‘नवे सामर्थ्य, व्हिजन दिले’

पंतप्रधान मोदींकडून दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे उद्घाटन 

Google News Follow

Related

आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे उद्घाटन आज (१५ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. भारताचा समृद्ध वारसा, नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी आजचा दिवस मोठा असल्याचे त्यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौसेनेला नवे सामर्थ्य, व्हिजन दिले. त्यांच्या या पवित्र भूमीवर आज आपण २१व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, १५ जानेवारीला भारतीय सेना दिवस म्हणूनही साजरा केला जातो. देशाच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या प्रत्येक जाबाज सैनिकाला माझे नमन. “हे पहिल्यांदा होतय, जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरीन तिघांना एकत्र कमिशन केल जात आहे आणि गर्वाची गोष्ट म्हणजे हे तीनही फ्रंट लाईन प्लॅटफॉर्म ‘मेड इन इंडिया’ आहे.

आजचा भारत एक मोठी जागतिक शक्ती बनत आहे. आज जे प्लॅटफॉर्म लाँच झाले आहेत त्यामध्येही याची झलक आहे. जसे कि आपला निलगिरी हा चौल वंशाच्या सागरी पराक्रमाला समर्पित आहे. सूरत वॉरशीप एका कालखंडाची आठवण करून देतो. जेव्हा भारत आशियाशी जोडलेला होता. काही वर्षापूर्वी मला पहिल्या पाणबुडीमध्ये सामील होण्याची संधी मिळाली होती. आता मला या क्लासच्या सहाव्या सबमरीनला कमिशन करण्याची संधी मिळाली आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म भारताची सुरक्षा आणि प्रगतीसाठी सामर्थ्य देईल.

हे ही वाचा : 

काँग्रेसच्या मुख्यालयाला इंदिरा गांधीचे नाव दिल्याने भाजपचा हल्लाबोल

युद्धनौका, पाणबुडी निंर्मिती हा भारताच्या बळकटीकरणाचा पुरावा

मुंबई बस अपघात : न्यायालयाने चालकाचा जामीन अर्ज फेटाळला

जसप्रीत बुमराह ठरला आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’

हे नवे फ्रंटलाइन प्लॅटफॉर्म भारताची सुरक्षा आणि प्रगतीला सामर्थ्य देतील. भारत ग्लोबल साऊथमध्ये जबाबदार सहकारी म्हणून ओळखला जातो. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादच्या भावनेतून काम करत आहे. नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. “सागरचा अर्थ सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दि रिजन. आपण सागरच्या व्हिजनने पुढे गेलो. जेव्हा आपण जी २०चं यजमानपद स्वीकारले. तेव्हा वन अर्थ, वन फ्युचर वन फॅमिलीचा मंत्र आपण दिला. कोरोनाच्या काळात आपण ‘वन अर्थ’, ‘वन हेल्थ’ हा मंत्र दिला. आपण संपूर्ण जगाला आपलं कुटुंब मानतो. आपण सबका साथ सबका विकासचा सिद्धांत पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे या क्षेत्राचं संरक्षण करणे भारत आपलं दायित्व समजतो”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे. गेल्या १० वर्षात भारताच्या तीनही सैन्याने ज्या पद्धतीने आत्मनिर्भरतेचा मंत्र अंगीकारला आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. संकटकाळात भारताचे इतर देशांवरील अवलंबने कमी असावे, या परिस्थितीचे गांभीर्य समजून तुम्ही सर्वजण हे काम पुढे नेत आहात, नेतृत्व देत आहात. आमच्या सैन्याने ५ हजारांहून अधिक वस्तू आणि उपकरणांची यादी तयार केली आहे, जी यापुढे परदेशातून आयात केली जाणार नाहीत.

जेव्हा भारतीय सैनिक भारतात निर्माण झालेली साधनसामग्री घेवून पुढे जातो तेव्हा त्याचा आत्मविश्वासही काही वेगळाच असतो. कर्नाटकात देशातील सर्वात मोठा हेलीकॉप्टर बनवणारा कारखाना निर्माण झाला आहे. आम्ही शंभरहून अधिक देशांना संरक्षण उपकरणे पुरवतो. आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ अनेक मोठ्या निर्णयाने सुरु झाला आहे.

ते पुढे म्हणाले, नवे नीती, कार्य, देशातील प्रत्येक कोपऱ्याचा, सेक्टरचा विकास व्हावा हे लक्ष्य ठेवून आम्ही पुढे चालत आहोत. बंदराचा विकास हा देखील याचाच भाग आहे. महाराष्ट्रातील वाढवण बंदर आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला मोठा निर्णय होता. ७५ हजार कोटींचा खर्च करून वाढवण बंदराची निर्मिती सुरु केली आहे. या बंदरामुळे हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पंतप्त्धन मोदींनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा