झारखंडच्या कुमन स्थानकावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.सासाराम-रांची इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरताच भीतीपोटी ट्रेनमधील प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या.या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, झारखंडमधील कुमन स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.प्रवासी ट्रेनमधून प्रवास करत असतानाच ट्रेनच्या इंजिनला आग लागल्याची अफवा पसरली.आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.आपला जीव वाचवण्यासाठी अनके प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या.परंतु, बाजूने येणाऱ्या मालगाडीने प्रवाशांना धडक दिली.मालगाडीच्या धडकेने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले.
हे ही वाचा..
छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाने ८ नक्षलवादी टिपले, एक जवान हुतात्मा!
विवान कारुळकरच्या पुस्तकाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली दखल
‘तंत्रज्ञानातील मक्तेदारी संपवा’
केजारीवालांचा न्यायालयातील व्हिडीओ पोस्ट प्रकरणी पत्नी सुनीता यांना नोटीस
लातेहारचे उपायुक्त गरिमा सिंग यांनी सांगितले की, या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत.शोधमोहिमेदरमायन तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.तर अजूनही शोधमोहीम सुरु आहे.