उत्तर कॅरोलिनामध्ये गोळीबारात तीन अधिकारी ठार, अनेक जण जखमी; संशयिताचा मृत्यू!

फेडरल अधिकाऱ्यांनी दिली माहिती

उत्तर कॅरोलिनामध्ये गोळीबारात तीन अधिकारी ठार, अनेक जण जखमी; संशयिताचा मृत्यू!

फरारी वॉरंट बजावण्याचा प्रयत्न करताना उत्तर कॅरोलिनामध्ये सोमवारी डेप्युटी यूएस मार्शलसह तीन अधिकाऱ्यांची गोळ्या झाडण्यात आली आणि इतर अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले, अशी माहिती फेडरल अधिकाऱ्यांनी दिली.

यूएस मार्शल टास्क फोर्सचा भाग असलेले अधिकारी शार्लोट भागात मोहीम राबवत असताना एका व्यक्तीने एका घरातून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर या घरात एक संशयित मृतावस्थेत आढळून आला. घटना घडताच पोलिसांच्या गाड्यांनी आणि रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. जवळचे रस्ते बंद करण्यात आले. या घरात एका संशयिताच्या मृतदेहासह अन्य दोघेही सापडले आहेत. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाची गुरूनानक यांच्या हाताशी तुलना!

संदेशखाली प्रकरणातील पीडित, भाजपा उमेदवार रेखा पात्रा यांना ‘एक्स-श्रेणी’चे सुरक्षाकवच

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळण्याची मागणी

अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत

गोळीबारात मृत्युमुखी पडलेले अधिकारी यूएस मार्शल्स फ्युजिटिव्ह टास्क फोर्सचे होते. अनेक अधिकारी या गोळीबारात जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील शाळांना दुपारच्या समारास सुट्टी जाहीर करण्यात आली होती. नंतर ती उठवण्यात आली. पोलिसांनी शेजारपाजारच्यांना घरातच राहण्याचे आवाहन केले. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version