लोकसभेतून आणखी तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.सभागृहाचा अवमान केल्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार नकुलनाथ,डीके सुरेश आणि दीपक बैज याना निलंबित करण्यात आले आहे.संसदेतून निलंबित करण्यात आलेली संख्या आता १४६ वर पोहोचली आहे.
संसदेच्या सुरक्षा भंगप्रकरणी १४ डिसेंबरपासून लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल आणि घोषणाबाजी केल्याबद्दल १४० हून अधिक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले होते.यात आता अधिक भर पडली आहे.काँग्रेसचे खासदार नकुलनाथ,डीके सुरेश आणि दीपक बैज याना निलंबित करण्यात आले आहे.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाल्यानंतर तीन खासदारांची नावे घेत तुम्ही सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत आहात, घोषणाबाजी करत आहात आणि कागदे फाडून लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात. हे कृत्य सभागृहाच्या मर्यादेविरोधात असल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.
हे ही वाचा:
प्रशांत कारुळकर यांना मेजर जनरल विक्रांत नाईक यांच्याकडून सन्मानचिन्ह
शपथ पूर्ण झाली, ५०० वर्षांनंतर क्षत्रिय घालणार पगडी आणि चामड्याचे जोडे!
उत्तर प्रदेशमध्ये पक्षही उभा रहात नाही आणि निवडणूकही जिंकत नाही
संसद भवनाची सुरक्षा आता ‘सीआयएसएफ’ करणार
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या तीन खासदारांना सभागृहात विरोध न करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना विरोधी खासदार घोषणाबाजी करताना ऐकू आले.प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच सभापतींनी आंदोलक सदस्यांना इशारा दिला आणि काँग्रेसच्या तीन खासदारांची नावे दिली.काँग्रेसचे खासदार नकुलनाथ,डीके सुरेश आणि दीपक बैज यांना आता निलंबित करण्यात आले आहे.