केदारनाथ धाम यात्रेदरम्यान आज एक मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे गौरीकुंडजवळील टेकडीवरून अचानक मातीचा ढिगारा आणि मोठे दगड मार्गावर कोसळले. या मार्गावरून जाणाऱ्या यात्रेकरूंवर हा मातीचा ढिगारा कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला तर अन्य याच पाच जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरु केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, यात्रेला जाणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी गरिकुंड रुग्णालयात पाठवण्यात आले आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा..
ग्रँटरोडमधील व्यवसायिकाला बनावट शिल्पे विक्रीकरुन २२ लाखांची फसवणूक
विकास प्रकल्प रद्द करणे हीच उद्धव ठाकरेंची खासियत !
गृहमंत्री अमित शहांच्या सुरक्षेत कुचराई, दोन तरुणांनी केला ताफ्याचा पाठलाग !
जरांगेंचा भंपकपणा उघड करून त्यांच्यावरच भूत नक्कीच उतरवू !
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ७.३० वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेत मृतांची ओळख पटली आहे. किशोर अरुण पराते (नागपूर ), सुनील महादेव काळे (जालना ), आणि अनुराग बिश्त ( उत्तराखंड) अशी मृतांची नावे आहेत.