छत्तीसगडमधील विजापूर-सुकमा सीमेजवळ मंगळवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान हुतात्मा झाले तर अन्य १४ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी सुकमापासून ४०० किमी अंतरावर असलेल्या रायपूरला नेण्यात आले आहे.
विजापूर-सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या टेकलगुडेम गावात सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर नक्षलवाद्यांकडून हल्ला करण्यात आला.नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील लोकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवारी सकाळी सुरक्षा दलाकडून नवीन सुरक्षा छावणी उभारण्याचे काम सुरु होते, तेव्हा नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला.
हे ही वाचा:
महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश!
छत्रपतींचा इतिहास; मोदी, शिववडा आणि शिवथाळी…
नाशिक: इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू!
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’
छावणी बांधल्यानंतर नक्षलवाद्यांनी जोनागुडा-अलिगुडा भागात गस्त घालणाऱ्या कोब्रा/एसटीएफ/डिआरजी या दलांवर गोळीबार सुरू केला.छावणीचे काम पूर्ण झाल्यानंतर २४ तासांच्या आत हा हल्ला झाला.नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देण्यात आले.मात्र, नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत ३ जवान हुतात्मा झाले असून १४ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आल्याची माहिती आहे.