28 C
Mumbai
Tuesday, April 1, 2025
घरविशेषजम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या चकमकीत ३ पोलीस हुतात्मा!

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या चकमकीत ३ पोलीस हुतात्मा!

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात गुरुवारी (२७ मार्च) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आणि दोन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन  दहशतवाद्यांना ठार केले आहे.

जुठाना येथील एका घनदाट जंगली भागात चार ते पाच दहशतवादी लपले होते आणि सुरक्षा दलाला याची माहिती मिळताच शोध मोहीम राबवण्यात आली आणि याच दरम्यान चकमक सुरु झाली. या चकमकीत तीन पोलीस जवानांना वीर गती प्राप्त झाली. चकमकीत सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जखमी झालेल्या दोन जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुतात्मा झालेल्या तीन पोलीस जवानांपैकी दोघे जण कठुआ गावातील होते तर तिसरा जवान रियासी गावातील होता.

कालच्या चकमकीत सहभागी असलेले दहशतवादी हे रविवारी हिरानगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पळून जाण्यात यशस्वी झालेले दहशतवादीच असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा विश्वास आहे. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सान्याल गावात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर एसओजीने ही कारवाई सुरू केली.

हे ही वाचा : 

उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ?

पूरन-मार्शच्या स्फोटक खेळीने लखनौला ‘हैदराबादी तडखा’

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास प्रसिध्द करावा!

महायुतीतील कोणता नेता वक्फ बोर्डावर प्रसन्न ?

२६ मार्च रोजी दहशतवाद्यांच्या शोधात सान्याल गावाजवळील जंगलात घेराबंदी करण्यात आली होती. ऑपरेशन दरम्यान डीजीपी नलिन प्रभात सतत आघाडीवर उपस्थित राहिले. डीजीपींनी पोलिस अधिकारी आणि स्टेशन प्रभारींसोबत बैठक घेत दहशतवाद्यांवर कारवाई करण्याच्या रणनीतींवर चर्चा केली. ते म्हणाले, दहशतवाद्यांना शोधा आणि त्यांचा खात्मा करा. दरम्यान, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
239,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा