मध्यप्रदेशातील कुनो पार्कमधील मादी ज्वाला चित्त्याने तीन शावकांना दिला जन्म!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरवर शावकांचा व्हिडिओ केला शेअर

मध्यप्रदेशातील कुनो पार्कमधील मादी ज्वाला चित्त्याने तीन शावकांना दिला जन्म!

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये एका मादी चितेने तीन शावकांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरवर शावकांचा व्हिडिओ शेअर केला आहे.कुनो पार्कच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, नवजात तीन पिल्लांची प्रकृती ठीक असून त्यांची काळजी घेतली जात आहे.

कुनो नॅशनल पार्कमधील ज्वाला नावाच्या मादी चितेने या तीन शावकांना जन्म दिला. नुकतेच काही आठवड्यांपूर्वी आशा मादी चितेने तीन शावकांना जन्म दिला होता.केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, नामिबियाची चित्ता मादी ज्वालाने तीन शावकांना जन्म दिला आहे.यापूर्वी मादी आशाने तीन पिल्लांना जन्म दिल्यानंतर अवघ्या काही आठवड्यानंतर ही आनंदाची बातमी समोर आली आहे.सर्व वन्यजीव प्रेमींना हार्दिक शुभेच्छा.भारतामध्ये वन्यजीवांची अशीच भरभराट होत राहिली पाहिजे.चित्ता प्रकल्प यशस्वी होवो, असे मंत्र्यांनी ट्विटकरत नवजात शावकांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हे ही वाचा:

एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा

शिकागोजवळ तीन ठिकाणी आठ जणांची गोळ्या झाडून हत्या

कोट्यवधींच्या सुवर्णदागिन्यांनी सजला रामलल्ला!

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म

दरम्यान, चित्ताप्रकल्प अंतर्गत नामिबियामधून सुरवातीला ८ चित्ते मध्यप्रदेशातील कुनो पार्कमध्ये आणले होते.त्यानंतर पुन्हा १२ चित्यांची भर पडली.एक मादी चित्याने चार शावकाना जन्म दिला होता.त्यापैकी तीन शावकांचा मृत्यू झाला.त्यानंतर मादी आशाने तीन शावकाना जन्म दिला.नुकतेच चित्ता शौर्यचे निधन झाले.असे एकूण १० चित्ते मरण पावले आहेत.यापूर्वी पार्कमधील संख्या एकूण १४ होती त्यात मादी ज्वालाच्या तीन शावकांची भर पडून ही संख्या १७ वर गेली आहे.

Exit mobile version