महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ३ बांगलादेशी नागरिकांना अटक!

वसई पोलिसांची कारवाई

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ३ बांगलादेशी नागरिकांना अटक!

महाराष्ट्रातील पालघरमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.वसई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तिघांविरुद्ध पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम आणि परदेशी कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात अवैधरित्या भारतात राहणाऱ्या तीन बांगलादेशींची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांच्या पथकाने ४ जानेवारी रोजी वसई परिसरात शोध घेतला. दरम्यान, तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. तिन्ही परदेशी नागरिकांचे वय २३ ते ४५ या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

पोटातून आणलेली कोकेनची कॅप्सूल पकडली; सकिनाका येथे दोन विदेशी नागरिकांना अटक!

मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!

शिवछत्रपती पुरस्कार यादीतून डावललेल्या खेळांच्या संघटना नाराज

निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार, मतदान केंद्राला लावली आग!

‘भारतात राहण्यासाठी वैध कागदपत्रे नव्हती’
वसई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ४ जानेवारी रोजी वसई परीसरात पोलीस पथकाने शोध घेतला असतात अवैधरित्या भारतात राहणाऱ्या तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. तीन बांगलादेशी नागरिकांची चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी वैध कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. तिघांविरुद्ध पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम आणि परदेशी कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version