जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी (२८ सप्टेंबर) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे चार जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. सर्व जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरूच आहे.
परिसरात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील आदिगाम गावात कारवाई सुरू केली आणि घरोघरी झडती घेत दहशतवाद्यांचा शोध सुरु केला. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलानेही गोळीबार सुरु केला.
हे ही वाचा :
‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये!
संजय राऊत यांचे स्वतंत्र न्यायालय आहे!
सेक्युलर फॅब्रिकच्या चिंध्या कुणी केल्या ते पप्पांना विचारा!
जरांगेंनी विश्वासार्हता गमावलीय काय?
कुलगामच्या आदिगाम देवसर भागात ही चकमक सुरू आहे. पोलिस आणि सुरक्षा दल तैनात आहेत. या संदर्भात पुढील तपशील दिले जातील, असे काश्मीर पोलिस झोनने ट्विट करत सांगितले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षानंतर पहिली विधानसभा निवडणुका होत असताना हिंसाचाराच्या तुरळक घटना घडत आहेत. ही निवडणूक तीन टप्प्यात होत असून त्यापैकी दोन टप्प्यांत १८ आणि २५ सप्टेंबर रोजी मतदान झाले आहे. आता तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सुरक्षा दल, पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.