मेघालयच्या पश्चिम खासी हिल्समध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ७.४७ वाजता ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही याआधी रविवारीही मेघालयात रविवारी ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण गारो हिल्समध्ये होता आणि तो ५ किमी खोलीवर होता. भारताचा ईशान्य प्रदेश हा उच्च भूकंपाच्या क्षेत्रात येतो, त्यामुळे या प्रदेशात वारंवार भूकंप होतात. यापूर्वी १६ एप्रिल रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. केंद्राकडून मिळालेल्या नोंदणीनुसार बिष्णुपूरच्या उत्तर-पश्चिम भागात सकाळी ७.२२ वाजता हा भूकंप झाला.
हे ही वाचा:
खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधींनी २० वर्षांनी सोडला बंगला
खारघर मध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र !
अखेर ३६ दिवसांनी अमृतपाल पोलिसांच्या जाळ्यात
घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्रीपदाची दावेदारी…
मेघालयाच्या आधी न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी झालेल्या या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती. भूकंपानंतर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.अधिकृत माहितीनुसार, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या म्हणण्यानुसार सोमवारी न्यूझीलंडजवळील केरमाडेक बेटांवर ७.३ तीव्रतेचा भूकंप झाला.हा भूकंप १० किमी खोलीवर होता. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटले आहे की, या भूकंपामुळे हवाई आणि व्यापक पॅसिफिकला कोणताही धोका नाही. त्सुनामीची स्थानिक शक्यता कोणत्याही निश्चित परिणामाशिवाय निघून गेली.
न्यूझीलंडच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने म्हटले आहे की ते या भूकंपाचा न्यूझीलंडवर परिणाम होऊ शकतो की नाही याचा अंदाज घेत आहेत, परंतु लोकांना दीर्घ किंवा तीव्र भूकंप जाणवल्यास किनारपट्टीच्या भागापासून दूर जाण्याचा सल्ला दिला आहे.