27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषअखेर सीएनजीची चिंता मिटली; बृहन्मुंबईत इतके पंप उभारणार

अखेर सीएनजीची चिंता मिटली; बृहन्मुंबईत इतके पंप उभारणार

महानगर गॅस लिमिटेडने केली भूखंडाची मागणी

Google News Follow

Related

वाहनांची वर्दळ वाढत असल्याने सीएनजी इंधनाची मागणीही वाढणार आहे. पण त्याची चिंता आता मिटणार आहे. लवकरच मोठ्या संख्येने सीएनजीचे पंप उभारले जाणार आहेत.

बृहन्मुंबईत २९६ नवीन सीएनजी पंप उभारले जाणार आहेत. त्यासाठी महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) ५०० ते १२२५ चौरस मीटरच्या भूखंडांची मागणी केली आहे.

महागर गॅस लिमिटेड ही केंद्र सरकारच्या गॅस प्राधिकरणाची उपकंपनी आहे. एमजीएल बृहन्मुंबईतील १.६ लाख घरांना स्वयंपाकाचे इंधन म्हणून पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवते. त्याशिवाय मुंबईत सर्व ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब आणि अनेक बस नैसर्गिक वायूवर म्हणजेच सीएनजी वर चालतात. या सीएनजीचा पुरवठा महानगर गॅसच करतात. यासाठी कंपनीचे सध्या बृहन्मुंबईत सुमारे ३०० पंप आहेत. मात्र आता कंपनीला आणखी २९६ पंप सुरू करायचे आहेत. यासाठी कंपनीने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

हे ही वाचा:

सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर

कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?

९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश

साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’

महानगर गॅसने मुंबई आणि ठाण्यासाठी ५०० चौरस मीटरच्या जमिनीसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. “या जमिनी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी आणि बदलापूर शहरांसह मुंबईतील आणि आसपासच्या मुख्य रस्त्यांवर असावेत “, असे कंपनीने म्हटले आहे. तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर, महाड, अलिबाग, रोहा, माणगाव या तालुक्यांतील विशिष्ट भागात १२२५ चौरस मीटर जमिनीची मागणी करण्यात आली आहे. हे अर्ज एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) स्वरूपात आमंत्रित केले आहेत आणि त्यासंबंधी अधिक माहिती कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा