मुंबईच्या केईएम रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे.
या रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी म्हटले आहे की, काही विद्यार्थी हे कोरोना पॉझिटीव्ह आहेत. पण यापैकी काहींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत तर काहींमध्ये दिसत नाहीत.
या २९ जणांपैकी २३ जण हे एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाला असून ६ जण हे एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला आहेत. पण विशेष बाब म्हणजे २९ पैकी २७ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे, असे म्हटले जात आहे. पण रुग्णालयाकडून त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.
जे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे, त्यातील दोघांना सेव्हन हिल्स या अंधेरीतील हॉस्पिटलला आणण्यात आले आहे. तर इतरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पण हे विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले तरी कसे हे मात्र अद्याप कळलेले नाही. पण हॉस्पिटलच्या सूत्रांनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ही लागण पटकन झाली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे २३ विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना निदान एक लस देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
…आणि अमरिंदर सिंगचा झाला ‘फुटबॉल’, काय घडले असे विचित्र?
गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड ईडीसमोर जाणार?
… आता निश्चितच काँग्रेसमध्ये राहणार नाही
बंगालमध्ये मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक
मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या ५०० च्या पलिकडे गेली होती. गेल्या २४ तासांत ३६८८७ चाचण्या करण्यात आल्या तर बुधवारी ४९ लोकांनी प्राण गमावले. त्यातील ६ जण हे मुंबईत मृत्युमुखी पडलेले आहेत. सध्या राज्यात ३६६७५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.