उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २७ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन ही भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरू होता. सत्संग समारंभाचा समारोप होत असताना एकाएकी गर्दीत गोंधळ निर्माण झाला आणि धक्काबुक्की झाली. हा समारंभ एका मोठ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. एकाएकी गोंधळ उडाल्यामुळे लोकांची धावपळ झाली आणि काही जणांनी बाहेर पडण्यासाठी एकमेकांना धक्का दिला. यात अनेक लोक जमिनीवर पडले. या पडलेल्या माणसांना उचलण्या ऐवजी लोकांनी त्यांच्या अंगावर पाय देऊन मार्ग काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे काहींचा मृत्यू झाला. २७ मृतांमध्ये दोन पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल
बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!
राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ
४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !
गर्दीत अचानक गोंधळ निर्माण होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, समारंभाच्या आयोजकांनी गर्दीच्या नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था केली नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे या प्रकारची दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेत जखमी झालेल्या महिलांना आणि बालकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.