पश्चिम त्रिपुरामध्ये १९७१ च्या भारत-पाक युद्धातील २७ मोर्टारचे गोळे सापडले !

मुक्ती वाहिनीच्या सदस्यांनी शेल्स लपवल्याचा गावकऱ्यांचा दावा

पश्चिम त्रिपुरामध्ये १९७१ च्या भारत-पाक युद्धातील २७ मोर्टारचे गोळे सापडले !

त्रिपुराच्या पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात गुरुवारी(१८ जुलै) १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळातील किमान २७ मोर्टार शेल सापडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तलाव बांधण्यासाठी खोदकाम सुरु करत असताना कामगारांना हे मोर्टारचे गोळे सापडले.

पोलिसांनी सांगितले की, दुलाल नामा हे आपल्या जागेवर मत्स्यपालनासाठी तलाव बांधत होते. त्यावेळी खोदकाम करत असताना कामगारांना मोर्टारचे गोळे सापडले. सुरुवातीला, १२ मोर्टार शेल सापडले त्यानंतर पुढील उत्खननात, आणखी १५ सापडले. बामुटिया चौकीचे प्रभारी अधिकारी म्हणाले की, सापडलेले मोर्टार शेल्स अंदाजे ५० वर्ष जुनी असून मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. शेल्स वरील लेबल देखील नष्ट झाली आहेत. त्यामुळे हे शेल्स केव्हा आणि कोठे बनवले याची अचूक माहिती नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. इतिहासकारच याची माहिती देऊ शकतील , असे अधिकऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह गोठवले !

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू लांडाच्या प्रमुख साथीदाराला एनआयएकडून अटक

इटलीतील ‘जी ७’ व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा सहभाग

विशाळ गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती !

 

दरम्यान, सापडलेली ही शेल्स मुक्ती वाहिनीच्या (बांगलादेश स्वातंत्र्यसैनिक, १९७१च्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी लष्कराविरुद्ध गनिमी युद्ध लढणारी संघटना होती) सदस्यांनी हे मोर्टार शेल्स लपविले असतील, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version