२० नोव्हेंबरला मध्यरेल्वेचा २७ तासांचा मेगाब्लॉक

कर्नाक पुलाचे बांधकाम पाडण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेणार

२० नोव्हेंबरला मध्यरेल्वेचा २७ तासांचा मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वेस्थानकांदरम्यान जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचे बांधकाम पाडण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी उपनगरीय मार्गावर काही स्थानकांपर्यतच रेल्वे चालविण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या ३६ गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच १५४ वर्ष जुन्या असेलेला हा कर्नाक पूल धोकादायक असून वापरण्याच्या स्थितीत नसल्याने हा पुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मेगाब्लॉकच्या दरम्यान २० नोव्हेंबर रोजी उपनगरीय सेवा मुख्यमार्गावर भायखळ्यापर्यंतच चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील सेवा ही वडाळापर्यंतच चालविण्यात येणार आहे. तसेच हे धोकादायक पूल पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता सुरु होणार असून २१ नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री २ पर्यंत हे काम चालू असणार आहे. परिणामी या २७ तासांच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा व हार्बर मार्गावरील वडाळ्यापर्यंत रेल्वेसेवा बंद
ठेवण्यात येणार आहे. तर त्यामुळे कसारा, खोपोली, कर्जत येथून येणाऱ्या लोकल गाड्या भायखळा, दादर आणि कुर्ल्यापर्यंत चालविल्या जाणार आहेत. तशाच प्रमाणे पुन्हा डाऊन दिशेला या लोकल गाड्या सुटतील. यावेळी मध्यरेल्वेच्या सर्व वातानुकूलित लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

मात्र यावेळी काही लोकल गाड्यांचे फेऱ्या रद्द ही करण्यात येणार आहे तर मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या ३६ मेल-एक्सप्रेस गाड्या ही रद्द करण्यात येणार आहेत. तर १९ नोव्हेंबर रोजी गरिबरथ एक्सप्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, नांदेड राज्यराणी एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर २० नोव्हेंबर रोजी मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई-जालना जनशताब्धी एक्सप्रेस, मुंबई-मनमाड विशेष एक्सप्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस तर महालक्ष्मी एक्सप्रेस यासारख्या लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

मोरबी दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या माजी आमदाराला भाजपाकडून बक्षीस

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

तर कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या पैकी कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या १९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबई ऐवजी पनवेल येथून सुटणार आहेत. तसेच यापैकी काही गाड्या दादर तसेच पुण्याहून सोडण्यात येणार आहे. मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस, फिरोजपूर इंद्रायणी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस यासह अन्य काही गाड्या दादर व पनवेलपर्यंतच चालविल्या जाणार आहेत.

Exit mobile version