भारताची नौदल शक्ती आता अधिक सशक्त होणार आहे. लवकरच २६ नेव्ही राफेल भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. भारताने फ्रान्सकडून २६ राफेल आणि फ्रान्सने डिझाईन केलेल्या ३ स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेखालील सुरक्षा अधिग्रहण समितीने या प्रस्तावाला अनुमोदन दिले होते.
नेवी राफेल हे भारतीय नौसेनेसाठी कसे उपयुक्त आहेत, यासंदर्भातील सादरीकरण यावेळी मांडण्यात आले. भारताच्या ताफ्यात सध्या ३६ राफेल विमाने आहेत. ही विमानेही भारताने फ्रान्सकडून विकत घेतली आहेत. आता ही २६ नेव्ही राफेलही ताफ्यात दाखल होणार असल्याने भारताचे हवेतील तसेच, समुद्रातील सामर्थ्य अधिक वाढणार आहे.
हे ही वाचा:
रशिया-युक्रेन यांच्यात शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार
अश्विनच्या माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघ ढेपाळला
नार्वेकरांकडून न्यायाची अपेक्षा नाही म्हणत राऊतांनी पायावर धोंडाच मारला
फडणवीसांना सांगायचे होते ते थोरातांनी उलगडले…
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राफेलसह अन्य शस्त्रे, सुटे भाग आणि अन्य उपकरणांसहित बाबी खरेदी करण्यासाठी दोन्ही देशांत करार होणार आहे. त्याचवेळी किमती आणि अन्य अटी-शर्तींबाबत फ्रान्सच्या सरकारसोबत चर्चा केली जाईल. या दोन्हींचा खर्च ८० ते ८५ हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो. पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना हा करार होत आहे.
संरक्षण मंत्रालयाची सर्वोच्च संस्था डीएसीने या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच, भारत आणि फ्रान्सचे अधिकारी भविष्यातील ऍडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट (एमसीए) सहित अद्ययावत विमानांना सक्षम करण्यासाठी भारतात लढाऊ जेट इंजिन विकसित करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.