29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषमध्यप्रदेशात बालगृहातून २६ मुली बेपत्ता; धर्मांतर केल्याची भीती!

मध्यप्रदेशात बालगृहातून २६ मुली बेपत्ता; धर्मांतर केल्याची भीती!

माजी मुखमंत्री शिवराज सिंह यांच्याकडून चौकशीची मागणी

Google News Follow

Related

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका बालिकागृहातून २६ मुली गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हे बालिकागृह बेकादेशीररित्या आणि परवानगी शिवाय चालवत असल्याची माहिती आहे. वसतिगृहातून बेपत्ता झालेल्या मुली गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सीहोर, रायसेन, छिंदवाडा, बालाघाट येथील रहिवासी होत्या. परवानगीशिवाय बालिकागृह चालवल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी भोपाळच्या बाहेरील परवालिया येथे चालवल्या जाणाऱ्या ‘आंचल मुलींच्या वसतिगृहाला’ अचानक भेट दिली होती. यावेळी त्यांनी रजिस्टर तपासले असता त्यात ६८ मुलींच्या नोंदी होत्या मात्र त्यातील २६ मुली गायब असल्याचे आढळून आले.वसतिगृहात चौकशी केली असता आढळून आले की, रस्त्यावरून सोडवलेल्या मुलांची माहिती न देता, परवाना न घेता गुपचूप मुलींचे गृह चालवले जात होते आणि विशेष म्हणजे वसतिगृहातील मुलींना ख्रिश्चन धर्माचे पालन करायला लावले जात होते. या बालिकागृहात ६ ते १८ वर्षे वयोगटातील ४० पेक्षा जास्त मुली या हिंदू आहेत.

राष्ट्रीय बाल आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनीही मध्य प्रदेशचे मुख्य सचिव वीरा राणा यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. भोपाळच्या परवालिया पोलीस स्टेशन परिसरात हे अवैध बालिकागृह चालवले जात होते. भोपाळमधील एका खासगी एनजीओच्या वसतिगृहातून (चिल्ड्रन होम) मुली गायब झाल्यानंतर या वादाला सुरुवात झाली.

हे ही वाचा:

अवघ्या १० दिवसांत अंबती रायुडू वायएसआर काँग्रेसमधून ‘आऊट’!

पन्हाळ्याच्या शेजारी पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा केला जमीनदोस्त

मार्कोस कमांडोनी जहाज घेतले ताब्यात; वाचवले भारतीयांचे प्राण!

हॉलिवूड अभिनेत्याचे विमान समुद्रात कोसळले; मुलींनीही जीव गमावला!

बालगृहाचे संचालक अनिल मॅथ्यू यांना बेपत्ता मुलींबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.त्यानंतर पोलिसांना या वसतिगृहाची माहिती देण्यात आली. एफआयआरनुसार, मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या या बालगृहात अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी ट्विट केले की, ‘राज्य बाल आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांसह मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बेकायदेशीरित्या चालवल्या जाणाऱ्या बालगृहाची पाहणी केली.वसतिगृहात चौकशी केली असता आढळून आले की, रस्त्यावरून सोडवलेल्या मुलांची माहिती न देता, परवाना न घेता गुपचूप मुलींचे गृह चालवले जात होते आणि विशेष म्हणजे वसतिगृहातील मुलींना ख्रिश्चन धर्माचे पालन करायला लावले जात होते. या बालिकागृहात ६ ते १८ वर्षे वयोगटातील ४० पेक्षा जास्त मुली या हिंदू आहेत.

शिवराज सिंह यांच्याकडून चौकशीची मागणी
ही बाब समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर लिहिले की, भोपाळच्या परवालिया पोलीस स्टेशन परिसरात परवानगीशिवाय चालवण्यात आलेल्या बालगृहातून २६ मुली बेपत्ता झाल्याचे प्रकरण माझ्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन मी सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी अशी विनंती करतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा