मुंबईत कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूलमध्ये २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एकीकडे तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर शाळा सुरू करण्यासंदर्भातही हालचाली सुरू आहेत. त्याच दरम्यान या घटनेमुळे नवनव्या शंका उपस्थित होत आहेत.
कोरोनामुळे ही आश्रमशाळा बंद होती. पण आता ती उघडण्यात आली होती. मात्र त्यातील विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलांसमवेत आणखी ७ जणांनाही कोरोना झाल्याचेही आढळले आहे.
या मुलांपैकी ४ मुले ही १२ वर्षांखालील आहेत आणि त्यांना नायर हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे तर ११ मुले ही १२ ते १८ वयोगटातील आहेत. त्यांना रिचर्डसन-क्रुडास कोविड वॉर्डात भरती करण्यात आले आहे. ७ अन्य लोकांनाही कोविड वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये अफगाणिस्तानातून ड्रग्जची तस्करी?
राष्ट्रकुल सुवर्ण विजेते,महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख कालवश
कॅमेरामन सौंदडे यांचे म्युकरमायकोसिसमुळे निधन
आता राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. त्यात आता या घटनेमुळे शाळा उघडण्यासंदर्भातील निर्णयाचे काय होणार अशी शंका उपस्थित केली जात आहे.