२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!

मंत्रिमंडळ बैठकीत टोलच्या किंमतीवर झाले शिक्कामोर्तब  

२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!

महायुती सरकारची मंत्रिमंडळ बैठक गुरुवार, ४ जानेवारी रोजी पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’वरून प्रवासासाठी वाहनांना तब्बल २५० रुपये पथकर (टोल) भरावा लागणार आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसंच, अन्य महामार्गाच्या तुलनेत हा दर कमी असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे.

मुंबईतून कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात जलद आणि सुखद प्रवास करता यावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या पुलाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाची किंमत आता २१ हजार २०० कोटींवर गेली आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होणार आहे. प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला असून त्यासाठी नवी मुंबईतील उलवेजवळ शिवाजीनगर आणि चिर्ले (गव्हाण) या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार आहेत.

या मार्गासाठी ५०० रुपये टोल घेतला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, ही किंमत आता २५० असणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या मार्गावरील पथकराचा दर मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे- वरळी सागरी सेतूवरील पथकरांपेक्षा कमी असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

मंत्रिमंडळातील इतर महत्त्वाचे निर्णय

Exit mobile version