चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस रविवार, ५ जून रोजी संध्याकाळी दरीत कोसळून अपघात झाला. उत्तरकाशीजवळ झालेल्या या अपघातात २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बस ३० प्रवाशांना घेऊन यमुनोत्रीला जात होती, अशी माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरून ही बस यमुनोत्रीकडे जात होती. उत्तराखंड राज्याच्या हद्दीत दामता येथे ही बस दरीत कोसळली. अपघात झालेले ठिकाण हे उत्तर काशी ते देहरादून यांच्या दरम्यान आहे. या बसमध्ये ३० जण होते. तर अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
मृत झालेले भाविक हे मध्य प्रदेशचे होते. या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच ते रात्री उत्तराखंडला रवाना झाले आहेत. मंत्री ब्रजेंद्र प्रताप सिंह आणि चार वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत उत्तराखंडला गेले आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना ५० हजार देण्याची घोषणा केली आहे.
हमारी एक टीम दिल्ली से उत्तराखंड के लिए रवाना हुई है, जो राहत, बचाव, इलाज के अलावा मृतक श्रद्धालुओं के शव परिजनों तक पहुंचाने की व्यवस्था करेगी। मृतकों के परिजनों को 5-5 लाख व गंभीर रूप से घायलों को 50-50 हजार रुपए सहायता राहत राशि दी जाएगी। घायलों का उपचार हमारी प्राथमिकता है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) June 5, 2022
हे ही वाचा:
रशिया- युक्रेन युद्धाच्या १०० दिवसांचा आढावा
मध्य प्रदेशच्या सुजालपूरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार, मुलीचा झाला मृत्यू
‘राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणारच’
पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे लक्ष्य मुदतीआधीच गाठले
उत्तराखंडच्या सरकारनेही शोक व्यक्त करत नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
उत्तरकाशी के पुरौला में डामटा के पास हुई हृदयविदारक सड़क दुर्घटना के दृष्टिगत मृतकों के परिजनों को 1 लाख रुपए एवं घायलों को 50 हजार रुपए की सहायता राशि दिए जाने की घोषणा करता हूं।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) June 5, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तसेच जखमींच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who lost their lives in the accident in Uttarakhand. The injured would be given Rs. 50,000 each.
— PMO India (@PMOIndia) June 5, 2022