ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील २४ जवानांचा समावेश

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील २४ जवानांचा समावेश

२६ जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा अभिमान वृद्धिंगत करण्यासाठी सहभागी होणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील २४ जवानांचा समावेश आहे. या २४ खेळाडूंमध्ये २२ पुरुष असून त्यात भालाफेकपटू सुभेदार नीरज चोप्रा यांचा समावेश आहे. याशिवाय या चमूत दोन महिला आहेत. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच लष्करी महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.

२०२० टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते सुभेदार नीरज चोप्रा पुन्हा सर्वोच्च सन्मानासाठी मैदानात उतरणार आहेत. २०२३ मधील आशियाई क्रीडा स्पर्धा, २०२३ मधील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, २०२४ मधील डायमंड लीग आणि २०२४ मधील पावो नुर्मी क्रीडा स्पर्धा या प्रत्येक स्पर्धेत चोप्रा यांनी सुवर्णपदक मिळवून असामान्य कामगिरी केली आहे. यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील त्यांचा सहभाग आणखी विशेष बनला आहे.

हेही वाचा..

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आरोपी भावेश भिंडे विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करणार

मुंबईतील ग्रँट रोड परिसरात म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला

हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांना अटक !

राहुल गांधी यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनावे

२०२२ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता हवालदार जैस्मिन लॅम्बोरिया आणि २०२३ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मधील कांस्यपदक विजेती सीपीओ रीतीका हुडा या दोघी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांच्या रुपाने सशस्त्र सेना दलातील महिला कर्मचारी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यश संपादन करून इतिहास रचणे, हेच या दोघींचे ध्येय आहे. या दोघी अनुक्रमे मुष्टीयुद्ध आणि कुस्ती या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत.

सुभेदार अमित पंघल (मुष्टीयुद्ध); सीपीओ तजिंदरपाल सिंग तूर (शॉट-पुट); सुभेदार अविनाश मुकुंद साबळे (३००० मी स्टीपलचेस); सीपीओ मोहम्मद अनस याहिया, पीओ (जीडब्ल्यु) मोहम्मद अजमल, सुभेदार संतोष कुमार तमिलरासन आणि जेडब्ल्युओ मिजो चाको कुरियन (४ X४००M पुरुष रिले); जेडब्ल्युओ अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी); सुभेदार तरुणदीप राय आणि सुभेदार धीरज बोम्मादेवरा (तिरंदाजी) आणि नायब सुभेदार संदीप सिंग (शूटिंग) सशस्त्र सेनेतील या जवानांचा पदक मिळवून देशाला गौरव प्राप्त करून देण्याची मनिषा बाळगणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमधील सशस्त्र सेना दलातील कर्मचाऱ्यांचा सहभाग संपूर्ण देशात क्रीडा जागृती वाढवत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सशस्त्र दलांची वचनबद्धता अधोरेखित करतो. या खेळाडूंच्या कामगिरीचा साक्षीदार होण्यासाठी देश सज्ज होत असतानाच देश प्रत्येक सहभागीला शुभेच्छा देत आहे आणि या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी एकजुटीने उभा आहे.

Exit mobile version