मुंबईसह राज्यभरात मंगळवारी दहीहंडीचा जल्लोष दिसून आला. काही ठिकाणी गोविंदांच्या उत्साहाला गालबोट लागण्याच्या घटनाही घडल्या. मुंबई महानगर क्षेत्रात दहीहंडी साजरी करताना काही ठिकाणी गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी २३८ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील तीन गोविंदांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मुंबईत गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर लावताना काही गोविंदा जखमी झाले. याची संख्या २३८ वर पोहचली असून जखमींपैकी ७४ गोविंदांना उपचार करून घरी पाठवण्यात आले. तर, बाकी गोविंदांना अधिक उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्याचे लक्षात आले आहे.
Maharashtra | 63 Govindas injured during Dahi Handi festival in Mumbai: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) August 27, 2024
दरम्यान, वाकोला येथील गोविंद पथकातील ३४ वर्षीय गोविंदाच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी दिली. तर, डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या सहा गोविंदांना के.इ.एम. मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये २५ वर्षीय गोविंदाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती के.इ.एम. अधिष्ठाता डॉ. मोहन देसाई यांनी दिली. एका १३ वर्षांच्या मुलीचे मांडीचे हाड मोडल्यामुळे तिला नायर रुग्णालयात दाखल केले आहे, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले. शिवाय राजावाडी रुग्णालयात तीन लहान मुलांना दाखल करून घेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे कुणीतरी मागितले ५०० रुपये!
…ते भाग्य स्वप्नीलच्या वाट्याला कधी येणार?
शिवरायांच्या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे, सरकार मोठा पुतळा उभारेल !
डॉक्टर बलात्कार-हत्येप्रकरणी भाजपकडून उद्या बंगाल बंदची हाक !
नवी मुंबईतही काही ठिकाणी दुर्घटना घडल्या. दिवसभरात एकूण सात गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी दोघांच्या पायाला गंभीर दुखापत असल्याने त्यांना वाशीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दोघांचे हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.