30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
घरविशेषसर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे नवीन पटनायक !

सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे नवीन पटनायक !

मुख्यमंत्री म्हणून केला विक्रम

Google News Follow

Related

ओदिशाचे नवीन पटनाईक हे रविवारी देशातील सर्वांत प्रदीर्घकाळ मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्ती ठरणार आहेत. बंगालचे दिवंगत कम्युनिस्ट मुख्यमंत्री ज्योती बसू यांना मागे टाकून ते ही कामगिरी करणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात २३ वर्षे आणि १३९ दिवस पूर्ण केले आहेत.नवीन पटनाईक ७६ वर्षांचे आहेत. सन १९९७मध्ये नवीन यांचे वडील व माजी मुख्यमंत्री बीजू पटनाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विरोधी पक्षांनी त्यांना नवशिक्या संबोधून बाद केले होते. मात्र आज त्यांनी या सर्वांना शांत बसवण्याची करामत केली आहे. ते सातत्याने विरोधकांवर मात करत आहेत.

सिक्कीमच्या पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर डिसेंबर १९९४ ते मे २०१९ असे २४ वर्षे १६६ दिवस मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम आहे. तर, बसू यांनी सलग २३ वर्षे बंगालवर राज्य करून सन २०००मध्ये हे पद सोडले होते. तर, चामलिंग हे सन २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.राजकारणात अचानक प्रवेश केलेल्या नवीन पटनाईक यांनी राजकारणाची कला लवकरच शिकून घेतली. त्यांनी सर्वांत प्रथम सन १९९७मध्ये अस्का येथे लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली होती.

हे ही वाचा:

रक्तदान शिबिराने सुरू झाला सेवासप्ताह

कुटुंब रंगलंय गप्पात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाची पंतप्रधान मोदींनी केले आस्थेवाईक चौकशी

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात उधळली जाणारी हळद ‘सेंद्रिय’ असावी!

‘आदेश नसतानाही यासिन मलिकला न्यायालयात का आणले?’

ही जागा त्यांचे वडील बिजू पटनाईक यांच्या मृत्यूमुळे रिकामी झाली होती. भाजपची मदत घेऊन पटनाईक आणि अन्य जण जनता दलापासून वेगळे झाले आणि त्यांनी बिजू जनता दलाची स्थापना केली. हे नाव त्यांच्या वडिलांच्या नावावरून ठेवले गेले. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने भाजपशी आघाडी केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ते खाण आणि खनिज मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री होते.

महाचक्रीवादळ आणि मुख्यमंत्रिपद
ऑक्टोबर, १९९९मध्ये महाचक्रीवादळ आले होते. त्यामध्ये १० हजारांहून अधिक जण मारले गेले होते आणि किनारपट्टीच्या अनेक भागांचे अतोनात नुकसान झाले होते. हा विध्वंस झाला नसता तर कदाचित पटनाईक केंद्रीय मंत्रिपदीच राहिले असते. मात्र तेव्हा ऑस्ट्रेलियाचे मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांच्या हत्येमुळे काँग्रेस सरकारवर टीका होत होती. त्यातच चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लोकांचे खाण्यापिण्याचे हाल होत असताना तत्कालीन मुख्यमंत्री गिरिधारी गमांग यांनी हात झटकले होते.

बिजू जनता दलाची भाजपशी आघाडी सन २००९पर्यंत कायम राहिली. मात्र कंधमाल दंगलीनंतर ही आघाडी तुटली. त्यांना त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेशी तडजोड करायची नव्हती.
मार्च २०००मध्ये त्यांनी चक्रीवादळामुळे ध्वस्त झालेल्या ओदिशाचा कारभार स्वत:च्या हाती घेतला. गेल्या २३ वर्षांत राज्याचे प्रति व्यक्ती उत्पन्न सन १९९-२०००मध्ये १० हजार ६६२वरून २०२२-२३मध्ये एक लाख ५० हजार ६७६ रुपयांवर पोहोचले आहे. १९५० आणि १९८०च्या दरम्यान ओदिशाचा विकासदर सुमारे २.७७ टक्के होता तेव्हा देशाचा विकास दर ३.५ टक्के होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा