बापरे! महाराष्ट्रातील २३ हजार महिला गायब

बापरे! महाराष्ट्रातील २३ हजार महिला गायब

महाराष्ट्र हा महिलांसाठी खरोखरच सुरक्षित आहे का हा सध्याच्या घडीचा यक्षप्रश्न आहे. नुकतेच एनसीआरबीने मांडलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील २३ हजार महिला गायब झालेल्या आहेत. परंतु या महिलांसंबधी नंतर मात्र अजूनही काहीच माहीती मिळाली नाही. त्यामुळेच या गायब झालेल्या महिलांचे पुढे नेमके काय झाले हा प्रश्न आता सतावत आहे.

महाराट्रातून गायब झालेल्या २३ हजार महिलांचे काय झाले हे मात्र अद्यापही कुणाच्याही समोर आलेले नाही. हजारांच्या पटीत असलेला हा आकडा नक्कीच चिंताजनक आहे. तसेच महिलांच्या अत्याचारामध्ये दिवसागणिक होणारी ही वाढ धक्कादायक आहे. देशामध्ये गायब होणाऱ्या महिलांच्या संख्येत गेल्यावर्षी सर्वाधिक वाढ झालेली होती. गेल्या वर्षी तब्बल ४९ हजार ३८५ गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर पश्चिम बंगाल येथून ३६,४३९ गुन्हे नोंदविण्यात आले.

राजस्थान येथून ३४,५३५ तर महाराष्ट्रामध्ये ३१,९५४ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यामुळेच हा आकडा खरोखरच खूपच धक्कादायक आहे. त्यामुळेच आता महिला अत्याचार आणि इतर अनेक प्रश्न घोंघावू लागले आहेत. २०१९ च्या तुलनेमध्ये महाराषट्रामध्ये गुन्हे घटले आहेत. परंतु या गुन्ह्यांवर पूर्णपणे नियंत्रण मात्र अजूनही आलेले नाही. २०२० मध्ये राज्यामध्ये २१६३ हत्येच्या घटना नोंदविण्यात आलेल्या आहेत. तसेच यामध्ये ५६४ महिलांचा समावेश होता. मुख्य म्हणजे यातील ११६ हत्या या प्रेमप्रकरणामधून झालेल्या होत्या. त्यानंतर अनैतिक संबंधातून १८३ जणींची हत्या झाली होती. महिलांचं अपहरण होण्याचे वा जबरदस्तीने त्यांना ओढून नेण्याचं प्रमाणही दिल्लीपाठोपाठ मुंबईत जास्त आहे.

हे ही वाचा:

दादर, मुलुंडमधील लोक वैतागले दूषित पाण्याला

भारताची राजकीय संस्कृती बदलणारा नेता

महेंद्रसिंग धोनी आता करणार एनसीसीसाठी ‘बॅटिंग’

सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

पॉक्सो म्हणजेच लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण करणाऱ्या कायद्याखाली नोंदवण्यात येणाऱ्या गुन्हयांचं प्रमाणही महाराष्ट्रात जास्त आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्येही अशा प्रकारच्या गुन्ह्यांचं प्रमाण मोठं आहे.

Exit mobile version