आज २३ ऑगस्ट जागतिक वडापाव दिवस. आजच्या दिवशी वडापाव जन्माला आला असं म्हणता येईल. वडापाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती मुंबई. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनी वडापावची चव चाखली आहे. वडापाव आवडत नाही अशी व्यक्ती निदान मुंबईत मिळणं तरी अशक्यचं.
वडापावचा जन्म कसा झाला?
दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य यांच्या गाडीवर वडापाव पहिल्यांदा १९६६ मध्ये बनला, असं म्हणतात. बटाट्याच्या भाजीचा गोळा बेसनात घोळवून तळून पावासोबत खाल्ला तर अधिक स्वादिष्ट लागतो हे लक्षात आल्यावर वडापावचा जन्म झाला आणि पुढे मुंबईच्या खाद्यसंसकृतीचा तो एक भाग बनला. सुरुवातीला हा वडापाव अगदी २० पैशाला मिळायचा. आज या वडापावची किंमत १५ रुपये आहे तर मॉल किंवा मोठ्या हॉटेल्समध्ये अगदी शंभर रुपयांनासुद्धा वडापाव मिळतो.
रात्रपाळीच्या आणि दिवसपाळीच्या मिलच्या कामगारांना स्वस्तात आणि पोटभर खायला मिळेल या उद्देशाने वडापावचा जन्म झाला, असंही म्हटलं जातं. गरीबांनाही परवडेल अशा दरात वडापाव मिळत असल्याने तो कमी कालावधीतच लोकप्रिय झाला आणि त्याची ख्याती सर्वदूर पसरली.
हे ही वाचा:
डान्सर सपना चौधरीला होणार अटक?
सातव्या थरावरून पडून मुंबईच्या गोविंदाचा मृत्यू
राकेश झुनझुनवाला ट्रस्टची जबाबदारी ‘या’ व्यक्तीच्या खांद्यावर
आता शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा
वडापावला खरी लोकप्रियता मिळाली ती १९७० ते १९८० च्या काळात. मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या. त्यानंतर मुंबईच्या गल्लीबोळात वडापावच्या गाड्या दिसू लागल्या.
मुंबईतील काही प्रसिद्ध वडापाव मिळण्याची ठिकाणं
सारंग वडा, प्रभादेवी
गजानन वडापाव, ठाणे
एम एम मिठाईवाला, मालाड
रामास, कांदिवली
भाऊ वडापाव, मुलुंड
ठाकूर वडापाव, डोंबिवली