34 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेष२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित

२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित

Google News Follow

Related

मुंबईत तैनात असलेल्या २२व्या मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन (MVS) ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे ८ डिसेंबर रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्डला जाऊन एका औपचारिक परेडमध्ये २२व्या मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन (MVS) ला राष्ट्रपती मानक प्रदान करतील.

ऑक्टोबर १९९१ मध्ये मुंबईत २२वे क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांचे पथक स्थापन करण्यात आले. यामध्ये वीर वर्गाच्या दहा आणि प्रबळ वर्गाच्या तीन क्षेपणास्त्रवाहू नौका आहेत. त्यापूर्वीच्या किलर स्क्वॉड्रन पथकातील युद्धनौका रशियातून आणल्या होत्या. त्यांनी बांगलादेशमुक्ती युद्धात मोठी कामगिरी केली होती. हे वर्ष बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ते देशभर स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

हे ही वाचा:

लवकरच स्वदेशी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान

‘ओबीसी आरक्षणाचा अध्यदेश गृहीत धरता येणार नाही’! ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

आंग सान स्यू की यांना चार वर्षांचा तुरुंगवास

उद्योग जगतातील आसामी रतन टाटांना ‘आसाम वैभव’

किलर स्क्वॉड्रन पथकाच्या स्थापनेचेही हे पन्नासावे वर्ष असून या पथकाने ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन विजय या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. या ताफ्याला तब्बल सात वीर चक्र, महावीर चक्र, तसेच आठ नौसेना शौर्य पदके देण्यात आली आहेत. पोस्ट खात्यातर्फे या सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट आणि पाकीट प्रसिद्ध केले जाणार आहे.

सैन्यदलांच्या पथकाकडून करण्यात आलेल्या देशसेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ हा पुरस्कार दिला जात असून हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याहस्ते नौदलाला २७ मे १९५१ रोजी प्रेसिडेंट कलर्स हा पुरस्कार देण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा