जालन्यात वितळलेले लोखंड अंगावर पडून २२ जण जखमी

लोखंड वितळवण्याच्या भट्टीत झाला स्फोट

जालन्यात वितळलेले लोखंड अंगावर पडून २२ जण जखमी

जालन्यात वितळलेले लोखंड अंगावर पडून दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील औद्योगीक वसाहतीत असणारी गजकेसरी स्टील कंपनीत हा प्रकार घडला. तीन ते चार मजूर या अपघातात गंभीर जखमी झाल्याचं प्रथमदर्शनी कळाल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं असून मजूरांवर उपचार सुरु आहेत.

गजकेसरी स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीत विस्फोट झाल्याने ही घटना घडली. लोखंड वितळवण्याच्या भट्टीत पातळ धातू असताना वरून घन धातू टाकल्याने सर्व धातू बाहेर उडाला. या लोखंड वितळवण्याच्या भट्टीत यामुळे स्फोट झाला. तसेच भट्टीच्या आजूबाजूला काम करत असलेल्या अनेक मजुरांच्या अंगावर हा धातू उडाला. या घटनेत २२ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा..

आसाम सामुहिक बलात्कार: तलावात बुडून मृत्यू झालेल्या आरोपीचा मृतदेह गावात दफन करू देणार नाही

महिलांना बुरखा घालण्यावर तालिबानच्या न्याय मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

पंजाबच्या अमृतसरमध्ये अनिवासी भारतीयावर गोळीबार

मुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !

या घटनेत तीन ते चार मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरो आहे. जे मजूर गंभीर स्थितीतून बाहेर आले त्यांचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

Exit mobile version