25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषरुळावरील वस्तूमुळे साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले

रुळावरील वस्तूमुळे साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले

आयबी, यूपी पोलिसांकडे अपघाताची तपासणी

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशच्या कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रेल्वे अपघाताची मोठी घटना घडली. वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे तब्बल २२ डबे रुळावरून घसरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातामुळे रेल्वेरूळ उखडला गेल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

उत्तर मध्य रेल्वेचे (एनसीआर) वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, ही घटना पहाटे अडीच वाजता घडली. कानपूर रेल्वे स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. जेव्हा घटना घडली तेव्हा प्रवासी झोपले होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

या घटनेवर लोको पायलटचे म्हटले की प्रथमदर्शनी असे दिसते की, बोल्डर इंजिनला आदळला होता, त्यामुळे इंजिनचे कॅटल गार्ड खराब झाले होते आणि वाकले होते. त्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आहे. मात्र, चौकशीनंतरच याबाबत काही सांगता येईल, असे लोको पायलटने सांगितले. या अपघातानंतर रेल्वेने प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करून देत कानपूरपर्यंत पोहोचवले. प्रवाशांना तेथून अहमदाबादला जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेची व्यवस्था करून दिली आहे. साबरमती एक्सप्रेस अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग वाळवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.

हे ही वाचा:

कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्राची मंजुरी

गंगा नदी मार्गावरील पुलाचा एक भाग तिसऱ्यांदा कोसळला

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी कारवाई होणार, राज्यपालांनी दिली मंजुरी !

 

दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताची माहिती दिली आणि अपघाताचे कारणही सांगितले. मंत्री वैष्णव यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, साबरमती एक्सप्रेसचं (वाराणसीवरून अहमदाबादला जाणारी रेल्वे) इंजिन सकाळी २.३५ वाजता कानपूरजवळ रुळावरून घसरले. रेल्वे रुळावर ठेवलेल्या काही वस्तूंना इंजिन धडकले व इजिनसह रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. आयबी (इंटेलिजेन्स ब्युरो) व उत्तर प्रदेश पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. ते पुढे म्हणाले, या अपघातात प्रवासी अधवा रेल्वे कर्मचाऱ्यांना इजा झालेली नाही. सर्वजण सुरक्षित आहेत. प्रवाशांना अहमदाबादला जाण्यासाठी बस (कानपूर स्थानकापर्यंत) व रेल्वेची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा