कर्नाटकाची राजधानी बंगळुरु येथे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. पाण्याचा गैरवापर टाळण्याच्या सूचना प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. मात्र, नागरिकांमध्ये अजूनही नागरिकांमध्ये सुज्ञपणा दिसून येत नाही. पिण्याचं पाणी मिळण्याचे संकट असताना शहरात अनेक नागरिक पाण्याचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. यानंतर या नागरिकांना प्रशासनाने दंड ठोठावला आहे. नागरिक या पाण्याचा गैरवापर करत असल्याचं समोर आल्यानं शहरातील २२ नागरिकांना मिळून लाखोंचा दंड स्थानिक प्रशासनानं ठोठावला आहे.
बंगळूरूमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बंगळुरु वॉटर सप्लाय आणि सिवेज बोर्डनं (BWSSB) वाहने धुणे, बागांना दररोज पाणी देणं, इमारतींचं बांधकाम, बागांमधील किंवा सोसायट्यांमधील पाण्याची कारंजी, वॉटर पार्क, सिनेमा हॉल आणि मॉल्स, रस्त्यांची बांधकामं आणि स्वच्छता मोहिम यासाठी पाण्याचा वापर करण्यास बंदी घातली आहे. तसेच पाण्याचा गैरवापर करताना कोणी आढळलं तर त्याला दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयानुसार, अनेक नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. यामध्ये २२ नागरिकांनी या नियमाचं उल्लंघन केल्याचे दिसून आले. बहुतांश शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांनी या नियमाचं उल्लंघन केलं आहे. यामध्ये ६५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामधून नागरिकांना लाखोंचा दंड भरावा लागला.
हे ही वाचा:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!
केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश!
आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी ताब्यात!
पाणी टंचाईची झळ थेट कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनाही बसली आहे. दरम्यान, त्यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की, सरकार कोणत्याही किंमतीत बंगळूरूला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी काम करेल. डी के शिवकुमार हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, “बंगळुरूच्या सर्व भागात पाण्याचे संकट आहे. शिवाय त्यांच्या घरातील बोअरवेलही कोरडी पडली आहे.”