विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!

मुंबई पोलिसांची कामगिरी

विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!

मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा दरम्यान गिरगाव चौपाटीवर गर्दीत कुटुंबापासून ताटातूट झालेल्या २२ मुलांच्या पालकांचा पोलिसांकडून शोध घेऊन मुलांना सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ४ ते ८ वयोगटातील ही मुले असून ते आपल्या कुटुंबासह विसर्जन सोहळा बघण्यासाठी गिरगाव चौपाटीवर आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गुरुवारी अनंत चतुर्दशीला हजारोच्या संख्येने लोक गिरगाव चौपाटीवर आले होते. या कालावधीत २२ मुले हरवली होती. मुंबई पोलिसांनी या सर्व मुलांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यातील एका अधिकारी यांनी सांगितले की, कुटुंबापासून विभक्त झालेल्या मुलांचे वय ४ ते ८ वर्षे आहे.

 

पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले होते, याशिवाय ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातच काही मुले त्यांच्या पालकांचा शोध घेत होते तर काही रडत असल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांनी या मुलांना चौपाटीवर तात्पुरता तयार करण्यात आलेल्या विशेष नियंत्रण कक्ष येथील पोलिसांच्या ताब्यात दिले.नियंत्रण कक्ष येथून लाऊडस्पीकरद्वारे हरवलेल्या मुलाच्या पालकांना सूचना देण्यात आल्या. मुले पोलीस नियंत्रण कक्षात असल्याची माहिती कळताच काही पालकांनी नियंत्रण कक्षात येऊन मुलांना ओळखले व स्वतःची ओळख दाखवून मुलांना घेऊन गेले.
पोलिसांनी उर्वरित मुलांकडे त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल नंबर मागितले.

 

हे ही वाचा:

आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्राकडे तीन वर्षांसाठी येणार!

शिक्षिकांचे विद्यार्थ्यांना आदेश…आमचे रिल्स लाइक करा, शेअर करा!

‘जय श्री राम’चा नारा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

परंतु गोंधळल्यामुळे मुलांना पालकाचा मोबाईल क्रमाक आठवत नव्हते, तर काही मुलांनी पालकांचे मोबाईल क्रमांक दिले, पोलिसांनी पालकांना फोन करुन त्यांना नियंत्रण कक्ष येथे बोलावून मुलाचा ताबा देण्यात आला. ज्या मुलांना मोबाईल क्रमाक आठवत नव्हते त्यांना त्याचे राहण्याचे ठिकाण विचारून त्या परिसरात मुलांना पोलिसांचे पथक पाठवून मुलांचे राहते ठिकाण शोधून पालकांची ओळख पटवून मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती पोलीस आधिकरी यांनी दिली.

Exit mobile version