25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषपॅरालिम्पिकमध्ये २१ वे पदक; महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारीला गोळा फेकमध्ये रौप्य

पॅरालिम्पिकमध्ये २१ वे पदक; महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारीला गोळा फेकमध्ये रौप्य

भारताने ४० वर्षांनंतर पॅरालिम्पिकमध्ये गोळा फेक क्रीडा प्रकारात जिंकले पदक

Google News Follow

Related

पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशीही भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. सांगलीच्या सचिन खिलारीने भारताला गोळा फेकमध्ये पहिले पदक मिळवून दिले आहे. सचिन सर्जेराव खिलारीने पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेमध्ये (F46) रौप्य पदक जिंकले आहे.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने ४० वर्षांनंतर पॅरालिम्पिकमध्ये गोळा फेक क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात पदक जिंकले होते. सचिन खिलारीने १६.३२ मीटर्सचा थ्रो करून दुसरे स्थान पटकावले आहे. तर, कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने १६.३८ मीटरचा थ्रो करत सुवर्णपदक मिळवले त्यामुळे सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले. कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका बाकोविच याने मिळवले. या स्पर्धेत एकूण तीन भारतीय सहभागी झाले होते. मोहम्मद यासर आणि रोहित कुमार यांनी अनुक्रमे १४.२१ मीटर आणि १४.१० मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह आठवे आणि नववे स्थान पटकावले आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सचिन याने सुवर्णपदक जिंकले होते. F46 श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश होतो ज्यांच्या हातांमध्ये कमकुवतपणा आहे, स्नायूंची ताकद कमी झाली आहे किंवा त्यांच्या हातांमध्ये मर्यादित निष्क्रिय गती आहे. सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे. भारताच्या खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकची पदक संख्या (१९ पदके) मागे टाकत विक्रमी यश प्राप्त केले आहे.

हे ही वाचा..

टेक्सासमध्ये भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

कंदाहार अपहरणावरील वेबसीरिजमध्ये दिसणार इस्लामी अतिरेक्यांची खरी नावे

…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग

सांगलीमधील करगणी येथे जन्मलेल्या सचिन खिलारी याचा वयाच्या नवव्या वर्षी सायकल अपघात झाला होता. ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर आणि गँगरीन झाले. असे असूनही अभियंता होण्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली. शिक्षण घेत असताना त्याने त्याची खेळाची आवड कायम ठेवली. सुरुवातीला त्याने भालाफेक करायला सुरुवात केली, पण खांद्याच्या दुखापतीनंतर त्याला गोळा फेकवर लक्ष द्यावे लागले. प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन याने शॉट पुटमध्ये आपले कौशल्य दाखवत जबदरस्त कामगिरी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा