१९ फेब्रुवारी रोजी भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची ही २१वी फेरी होती.भारताच्या चुशुल-मोल्डो सीमेवर ही बैठक पार पडली. या बैठकीत सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी भारत आणि चीनने सहमती दर्शवली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, २१वी भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक १९ फेब्रुवारी रोजी चुशुल-मोल्डो बॉर्डर मीटिंग पॉइंटवर झाली. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील भेटींमध्ये दोन्ही देशांचे सैन्य सीमावर्ती भागातून मागे घेण्याबाबत चर्चा झाली होती, हा भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील शांततेचा महत्त्वाचा आधार आहे. सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण पद्धतीने एकमेकांसमोर आपले विचार मांडले, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
दुराव्यानंतर पुन्हा अखिलेश यांचे काँग्रेसशी जुळले!
बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची झिशान सिद्दीकीवर कारवाई!
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये दोन्ही देशांदरम्यान २०वी बैठक झाली होती. या बैठकीत पश्चिम विभागातील एलएसी सोबतच इतर अनेक समस्या आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या लष्करी चर्चेदरम्यान भारताने डेपसांग आणि डेमचोकमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी चीनवर दबाव आणला होता. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस परिणाम होऊ शकला नाही.